Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

भूतकाळ विसरा, भविष्य घडवा; युवकांना नवी दिशा!

Solapur Mirror by Solapur Mirror
August 15, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
भूतकाळ विसरा, भविष्य घडवा; युवकांना नवी दिशा!

बाल न्याय मंडळातून बाहेर पडलेल्या युवकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा; करिअर, रोजगारासह सायबर सुरक्षेचे धडे

सोलापूर : बाल न्याय मंडळाच्या प्रक्रियेतून बाहेर पडलेल्या युवकांना भूतकाळातील अनुभव मागे सोडून आत्मविश्वासाने नवे भविष्य घडविण्याची प्रेरणा देण्यासाठी विशेष मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, बाल न्याय मंडळ, जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि कॅटलिस्ट्स फॉर सोशल ॲक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने १३ ऑगस्ट रोजी जिल्हा परिविक्षा व पश्चात काळजी संघटनेच्या निरीक्षण गृहात ही एकदिवसीय जनजागृती कार्यशाळा पार पडली.कार्यशाळेत सायबर सुरक्षा, करिअर व व्यवसाय, कौशल्यविकास, रोजगाराच्या संधी, व्यसनमुक्ती, बालकांशी संबंधित कायदे, बाल न्याय अधिनियम २०१५ तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा २०१२ या विषयांवर युवकांना मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी नितीन थोरात यांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानाची माहिती देत राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि देशभक्तीची भावना जोपासण्याचे आवाहन केले. यावेळी युवकांना ‘हर घर तिरंगा’ची प्रतिज्ञाही देण्यात आली.सायबर सुरक्षा विभागाचे अविनाश पाटील व प्रांजली काळे यांनी ऑनलाइन फसवणूक, सायबर गुन्हे आणि डिजिटल माध्यमांचा सुरक्षित वापर याबाबत मार्गदर्शन केले.

कॅटलिस्ट्स फॉर सोशल ॲक्शनचे लोकेशन प्रमुख अतुल भालेराव यांनी शिक्षण, कौशल्यविकास, रोजगार व व्यवसायाच्या विविध संधींची माहिती दिली.बाल न्याय मंडळाच्या अध्यक्षा न्या. अश्विनी बिराजदार यांनी युवकांशी मुक्त संवाद साधत त्यांच्या हक्क, जबाबदाऱ्या आणि सकारात्मक विचारसरणीचे महत्त्व समजावून सांगितले. बाल न्याय मंडळाच्या सदस्या प्रज्ञा खेंदाड यांनी बालकांशी संबंधित कायद्यांवर, तर बालकल्याण समितीचे अध्यक्ष समीर सय्यद यांनी बाल न्याय अधिनियमाबाबत मार्गदर्शन केले. सदस्या सुवर्णा कोकरे यांनी बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याची माहिती दिली.सारथी यूथ फाउंडेशनचे सचिव रामचंद्र वाघमारे यांनी व्यसनांचे दुष्परिणाम सांगत सकारात्मक जीवनशैलीचा अंगीकार करण्याचे आवाहन केले.

यावेळी युवकांसोबत स्वतंत्र संवाद साधून त्यांच्या वैयक्तिक अडचणी, शिक्षण, रोजगार, कौशल्यविकास आणि भविष्यातील योजनांची माहिती घेण्यात आली.कार्यशाळेला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अविनाश मगर, बाल न्याय मंडळाच्या सदस्या गीता तळकोकूळ, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी नितीन थोरात यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. आयोजन व समन्वय जिल्हा महिला व बाल विकास विभाग, बाल न्याय मंडळ व जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या कायदा तथा परिविक्षा अधिकारी अ‍ॅड. सारिका हुक्केरी तसेच कॅटलिस्ट्स फॉर सोशल ॲक्शनचे अभय जगताप यांनी केला.

| युवकांशी मुक्त संवादकार्यशाळेत सहभागी युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यांच्या अडचणी समजून घेत शिक्षण, रोजगार, कौशल्यविकास आणि भविष्यातील संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी युवकांना जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या वतीने प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

| सकारात्मक जीवनशैलीचा संदेश“चुका आणि अडचणी हा जीवनाचा शेवट नसून, त्यातून शिकून पुढे जाणे महत्त्वाचे आहे. सकारात्मक विचार, कौशल्यविकास आणि योग्य संधींच्या माध्यमातून युवकांनी स्वतःचे भविष्य घडवावे,” असा संदेश कार्यशाळेतून देण्यात आला.

Previous Post

ई-बसेसचा श्रीगणेशा; सोलापूरची सार्वजनिक वाहतूक होणार ‘स्मार्ट’

Next Post

गणेश बिल्डरचा वाद पुन्हा पेटला! खासदार प्रणिती शिंदे आक्रमक..

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
गणेश बिल्डरचा वाद पुन्हा पेटला! खासदार प्रणिती शिंदे आक्रमक..

गणेश बिल्डरचा वाद पुन्हा पेटला! खासदार प्रणिती शिंदे आक्रमक..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In