Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

मध्यवर्ती बँक निवडणुकीत कायदेशीर पेच; हसापूरे-शिवदारे अडचणीत?

Solapur Mirror by Solapur Mirror
August 24, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
मध्यवर्ती बँक निवडणुकीत कायदेशीर पेच; हसापूरे-शिवदारे अडचणीत?

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचे वातावरण तापत असतानाच माजी संचालक सुरेश हसापूरे आणि राजशेखर शिवदारे यांच्या उमेदवारीवरून नवा कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. दोन्ही माजी संचालकांविरोधात आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील कलम ८८ अंतर्गत जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, न्यायालयाने रक्कम भरण्याबाबत अंतिम आदेश दिल्याने त्यांच्या निवडणूक पात्रतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

मध्यवर्ती बँकेतील आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात संबंधित जबाबदारी निश्चित झाल्यानंतर न्यायालयीन आदेशामुळे माजी संचालक मंडळातील इच्छुकांसमोर अडचण उभी राहिली आहे. आदेशाची अंमलबजावणी, तसेच त्याविरोधातील पुढील कायदेशीर प्रक्रिया यावर त्यांच्या निवडणुकीतील सहभागाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील कलम ८८ अंतर्गत चौकशीत संस्थेला झालेल्या नुकसानीची किंवा गैरव्यवहाराची जबाबदारी निश्चित होऊन त्याबाबत अंतिम आदेश झाल्यास संबंधित व्यक्तीच्या संचालकपदावर राहण्याच्या तसेच निवडणूक लढविण्याच्या पात्रतेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या प्रकरणातील न्यायालयीन आदेशाला स्थगिती मिळते का, याकडे आता सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

स्थगिती मिळाल्यास मार्ग मोकळा?
संबंधित आदेशाविरोधात अपील किंवा पुनर्विलोकनात स्थगिती मिळाल्यास निवडणूक लढविण्याचा मार्ग खुला होऊ शकतो. तसेच संबंधित रक्कम पूर्णपणे भरून जबाबदारीतून मुक्त झाल्याचा दाखला उपलब्ध झाल्यास पात्रतेचा विचार होण्याची शक्यता आहे. मात्र अंतिम निर्णय निवडणूक व सहकार यंत्रणेच्या नियमांनुसारच होणार आहे.

सहकार विभागाच्या भूमिकेकडे लक्ष
दरम्यान, या प्रकरणावर सुनावणी होऊन स्थगिती मिळविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत उमेदवारी अर्जांची छाननी करताना संबंधित आदेशाचा कायदेशीर परिणाम कसा घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Tags: कलम ८८जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकमहाराष्ट्र सहकारी संस्थाराजशेखर शिवदारेसंचालक मंडळसुरेश हसापूरे
Previous Post

साखर साठ्याचा ‘खेळ’ उघड होणार?; कारखान्यांच्या नोंदींची प्रशासनाकडून तपासणी!

Next Post

सणासुदी आधी महागाईचा ‘श्रीगणेशा’; किराण्याच्या वाढत्या दरांनी गृहिणी हैराण

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
सणासुदी आधी महागाईचा ‘श्रीगणेशा’; किराण्याच्या वाढत्या दरांनी गृहिणी हैराण

सणासुदी आधी महागाईचा ‘श्रीगणेशा’; किराण्याच्या वाढत्या दरांनी गृहिणी हैराण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In