Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

३३ वर्षांची जलकोंडी; मानखुर्दच्या प्रश्नाला अखेर ‘रेल्वे’ची दखल!

Solapur Mirror by Solapur Mirror
July 23, 2026
in महाराष्ट्र, सोलापूर जिल्हा
0
३३ वर्षांची जलकोंडी; मानखुर्दच्या प्रश्नाला अखेर ‘रेल्वे’ची दखल!

सोलापूर : मुंबईतील मानखुर्द रेल्वे स्थानकालगतच्या वसाहतीत पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी साचण्याच्या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मध्य रेल्वेचे मुख्य अभियंता नवीन पाटील यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत पाणी निचऱ्याच्या उपाययोजना, रेल्वे हद्दीतील अडथळे आणि संबंधित यंत्रणांमधील समन्वयाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

मानखुर्द परिसरातील रहिवाशांना गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचण्याचा सामना करावा लागत आहे. १९९२ मध्ये नवी मुंबईकडे जाणारा नवीन रेल्वे मार्ग उभारण्यात आल्यानंतर पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक निचरा बाधित झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यानंतर रेल्वेच्या विस्तारीकरणाच्या विविध कामांमुळे नाल्याची रुंदी कमी होत गेली आणि पाणी साचण्याची समस्या अधिकच गंभीर बनली. परिणामी, दरवर्षी पावसाळ्यात चार महिन्यांपर्यंत येथील नागरिकांना पाण्यातूनच दैनंदिन जीवन जगावे लागते. घरांमध्ये पाणी शिरणे, वाहतुकीत अडथळे, आरोग्याच्या समस्या आणि नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान अशा अनेक अडचणींना येथील रहिवाशांना सामोरे जावे लागत आहे.

या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेचे मुख्य अभियंता नवीन पाटील यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पाणी निचरा सुरळीत होण्यासाठी रेल्वे, राज्य शासन आणि मुंबई महानगरपालिका यांच्या समन्वयातून संयुक्त उपाययोजना राबविण्याबाबत चर्चा झाली. बैठकीनंतर मुख्य अभियंता नवीन पाटील यांनी या प्रश्नाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची भूमिका घेतल्याचे सांगण्यात आले. संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून लवकरच व्यवहार्य आणि कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे प्रयत्न केले जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

मानखुर्दमधील नागरिक अनेक वर्षांपासून या समस्येच्या निराकरणाची वाट पाहत असून, आता संबंधित यंत्रणांनी पुढाकार घेतल्याने पावसाळ्यातील जलसंकटातून त्यांची सुटका होण्याची आशा निर्माण झाली आहे.

Tags: नवीन पाटीलमध्य रेल्वेमानखुर्दमुख्य अभियंतारेल्वे स्थानक
Previous Post

दिल्लीतील लाठीचार्जच्या निषेधार्थ सोलापुरात ४०० वकिलांचा एल्गार

Next Post

महसूल विभाग पुन्हा हादरला! ३३ हजारांच्या लाचप्रकरणी दोन अधिकारी अटकेत..

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
महसूल विभाग पुन्हा हादरला! ३३ हजारांच्या लाचप्रकरणी दोन अधिकारी अटकेत..

महसूल विभाग पुन्हा हादरला! ३३ हजारांच्या लाचप्रकरणी दोन अधिकारी अटकेत..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In