अंगणवाडी सेविका व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार; २१० नागरिकांची आरोग्य तपासणी
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा सप्ताहा’अंतर्गत भाजप ओबीसी मोर्चा (सोलापूर पूर्व) यांच्या वतीने कारंबा येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी अंगणवाडी सेविका व ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला, तसेच नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.या आरोग्य शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
तब्बल २१० नागरिकांची रक्तदाब (बीपी) व रक्तातील साखर (शुगर) तपासणी करण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासोबतच वेळेत आरोग्य तपासणीचे महत्त्व या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आले.समाजासाठी विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. सेवा सप्ताहाच्या माध्यमातून केवळ राजकीय कार्यक्रम न करता सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमास संभाजी दडे, विनायक सुतार, भगवान सुतार, अंबादास गायकवाड, नागनाथ पाटील, शहाजी गायकवाड, अकबर पटेल, सत्तारभाई शेख, राहुल मस्के, अमोल सुतार, संजय आदाटे, मशाक शेख यांच्यासह अंगणवाडी सेविका, ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.आरोग्य विभागाच्या वतीने श्रीमती सलगर, राणी, सुतार, कांबळे, शेटे, शेख पूजा, नागटिळक, उबाळे, कांबळे यांनी नागरिकांची आरोग्य तपासणी करून सेवा बजावली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय आदाटे यांनी केले. विनायक सुतार यांनी प्रास्ताविक, तर अमोल सुतार यांनी आभार प्रदर्शन केले.