No Result
View All Result
सोलापूर : सोलापूर बार असोसिएशनच्या निवडणुकीसाठी आज (मंगळवारी) बार असोसिएशनच्या हॉलमध्ये मतदान प्रक्रिया सुरू असून, मतदानानंतर त्याच ठिकाणी मतमोजणी होणार आहे.
यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होत असून, अध्यक्षपदासाठी तब्बल चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने अटीतटीचा सामना होण्याची शक्यता आहे.दरम्यान, दुपारपर्यंत एकूण १,६८८ मतदारांपैकी ६८८ वकिलांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानाला वकिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, उर्वरित वेळेत मतदानाचा टक्का आणखी वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.मतदान प्रक्रिया शांततेत सुरू असून, निकालाकडे संपूर्ण वकीलवर्गाचे लक्ष लागले आहे. अध्यक्षपदासह इतर पदांसाठीही चुरशीची लढत होत असल्याने यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
No Result
View All Result