Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

२ कोटींच्या सायबर फसवणूक प्रकरणातील आरोपीला सशर्त जामीन

Solapur Mirror by Solapur Mirror
May 8, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
२ कोटींच्या सायबर फसवणूक प्रकरणातील आरोपीला सशर्त जामीन
0
SHARES
21
VIEWS

सोलापूर : ऑनलाइन परीक्षा व मुलाखतींमध्ये सायबर तंत्रज्ञानाचा गैरवापर करून आयटी कंपन्यांची फसवणूक तसेच उमेदवारांकडून पैसे उकळल्याच्या गाजलेल्या प्रकरणातील आरोपीला सोलापूर न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात तब्बल दोन कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे.सोलापूर शहर सायबर पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्यानुसार आरोपी अशपाक हिफजुर्रहिमान अत्तार (वय ४६, रा. राजस्व नगर, विजापूर रोड) याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

पोलीस तपासात आरोपी “ULTRA INFOTECH IT” या नावाने कार्यालय चालवत असल्याचे समोर आले. ऑनलाइन मुलाखती व परीक्षांमध्ये रिमोट ॲक्सेस सॉफ्टवेअरचा वापर करून उमेदवारांच्या संगणकावर अनधिकृत प्रवेश घेतला जात होता. तसेच तृतीय व्यक्तीकडून परीक्षा देणे, बनावट सर्टिफिकेट तयार करणे आणि विविध कंपन्यांची फसवणूक करून उमेदवारांकडून पैसे उकळण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.या प्रकरणात सुमारे ३६६० जणांची आर्थिक फसवणूक झाल्याचे तपासात नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी एप्रिल महिन्यात छापा टाकून संबंधित कार्यालय सील केले होते. कारवाईदरम्यान विविध कंपनीचे लॅपटॉप, सीपीयू, मोबाईल फोन व इतर साहित्य असा ६२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.दरम्यान, आरोपीतर्फे दाखल करण्यात आलेल्या जामीन अर्जावर सुनावणीदरम्यान बचाव पक्षाचे वकील ॲड. कदीर औटी यांनी आरोपी तपासात सहकार्य करत असून आरोपपत्र दाखल होण्यास कालावधी लागणार असल्याने कोठडीची आवश्यकता नसल्याचा युक्तिवाद केला. कठोर अटी घालून आरोपीची उपस्थिती सुनिश्चित करता येईल, असेही न्यायालयास सांगण्यात आले.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री. एन. ए. मोर यांनी आरोपी अशपाक अत्तार यास सशर्त जामीन मंजूर केला. या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. कदीर औटी, ॲड. वैभव बोंगे, ॲड. ओंकार फडतरे यांच्यासह अन्य वकिलांनी काम पाहिले, तर सरकार पक्षातर्फे ॲड. कुलकर्णी यांनी बाजू मांडली.

Previous Post

कुंडूबावीमध्ये महिलेसह वृद्ध दांपत्यावर जीवघेणा हल्ला ; घरातील संसारोपयोगी साहित्य लुटल्याची तक्रार

Next Post

“माणूस म्हणून एकमेकांकडे पाहिल्यासच परिवर्तन शक्य” ; कृतिशील तरुणाई शिबिरात खासदार ज्योती वाघमारे यांचे प्रतिपादन

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
“माणूस म्हणून एकमेकांकडे पाहिल्यासच परिवर्तन शक्य” ; कृतिशील तरुणाई शिबिरात खासदार ज्योती वाघमारे यांचे प्रतिपादन

“माणूस म्हणून एकमेकांकडे पाहिल्यासच परिवर्तन शक्य” ; कृतिशील तरुणाई शिबिरात खासदार ज्योती वाघमारे यांचे प्रतिपादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025