Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

आषाढी वारीसाठी प्रशासन सज्ज; पालखी मार्गावर वाढणार सुविधा

Solapur Mirror by Solapur Mirror
June 5, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
आषाढी वारीसाठी प्रशासन सज्ज; पालखी मार्गावर वाढणार सुविधा

पंढरपूर, : आषाढी शुद्ध एकादशी सोहळा २५ जुलै २०२६ रोजी होत असून, यंदाच्या आषाढी यात्रेसाठी पालखी मार्ग, पालखीतळ आणि रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा तब्बल दीडपट अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पालखी सोहळा प्रमुख व विश्वस्तांनी केलेल्या मागण्या आणि सूचनांची अंमलबजावणी सुरू असून सुमारे ८० टक्के कामे पूर्णत्वाच्या मार्गावर असल्याची माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली.

आषाढी यात्रेच्या पूर्वतयारीसंदर्भात केबीपी महाविद्यालय, पंढरपूर येथे दहा मानाच्या पालख्यांचे विश्वस्त आणि सोहळा प्रमुख यांच्यासोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी सांगितले की, आषाढी वारीच्या अनुषंगाने भाविकांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी विविध विकासकामे सुरू आहेत. विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे काही निविदा प्रक्रियेला विलंब झाला होता. मात्र, निवडणूक आयोगाकडून आवश्यक परवानगी मिळाल्याने सर्व कामांना गती देण्यात आली असून पालखी सोहळे जिल्ह्यात दाखल होण्यापूर्वी सर्व कामे पूर्ण केली जाणार आहेत.

पालखी तळांवर मुरमीकरण, वाढीव जागांची उपलब्धता, सुलभ शौचालये, स्नानगृहे, वॉटरप्रूफ मंडप आणि रुग्णवाहिकांची संख्या वाढविण्यात येणार आहे. तसेच पालखी मार्गावरील पेट्रोल पंपांवर वाहनांना पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या जाणार असून एलपीजी गॅसचा पुरवठाही अखंड ठेवण्यात येणार आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी आपत्ती व्यवस्थापन आराखड्यानुसार विशेष नियोजन करण्यात आले असून वारी कालावधीत कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता प्रशासनाकडून घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी पालखी मार्ग व तळांवर जर्मन हँगर सुविधेत वाढ करण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या बैलजोड्या व घोड्यांसाठी स्वतंत्र निवारा आणि पशुवैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पालखी पुढे गेल्यानंतर संबंधित मुक्कामस्थळी तात्काळ स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

  • मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी गोपाळकाला झाल्यानंतर पूर्णिमेला होणाऱ्या संत देव भेट सोहळ्यासाठी विशेष नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सर्व संतांच्या पादुकांचे दर्शन सोहळे पारंपरिक पद्धतीने आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडतील, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. बैठकीत पालखी सोहळा प्रमुखांनी वाढत्या दिंडी संख्येमुळे काही ठिकाणी पालखी तळ अपुरे पडत असल्याची बाब मांडली. तसेच पोलीस बंदोबस्त वाढविणे, टँकरची संख्या वाढविणे, वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करणे आणि पालखीतळांचे मुरमीकरण करण्याच्या सूचना प्रशासनाकडे मांडल्या. दरम्यान, गतवर्षी पालखी मार्ग, पालखीतळ आणि रिंगण स्थळांवर प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या सुविधांबाबत पालखी सोहळा प्रमुखांनी समाधान व्यक्त करत यंदाही त्याच दर्जाच्या आणि अधिक व्यापक सुविधांची अपेक्षा व्यक्त केली.
Previous Post

आषाढी वारीत स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्या : विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

Next Post

शेतीपंपांना पूर्ववत वीज द्या; शेतकऱ्यांचा अंत पाहू नका : खासदार प्रणिती शिंदे

Related Posts

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी
सोलापूर जिल्हा

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

September 7, 2026
पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
Next Post
शेतीपंपांना पूर्ववत वीज द्या; शेतकऱ्यांचा अंत पाहू नका : खासदार प्रणिती शिंदे

शेतीपंपांना पूर्ववत वीज द्या; शेतकऱ्यांचा अंत पाहू नका : खासदार प्रणिती शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

September 7, 2026
पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In