Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिराचा होणार ‘कॉरिडॉर’ धर्तीवर कायापालट!

Solapur Mirror by Solapur Mirror
July 28, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिराचा होणार ‘कॉरिडॉर’ धर्तीवर कायापालट!

अक्कलकोट : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकासाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मंदिर परिसराचा विकास तीर्थक्षेत्र कॉरिडॉरच्या धर्तीवर करण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) यांची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यामुळे यश मिळाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली. या निर्णयामुळे अक्कलकोटच्या विकास आराखड्याला मोठी गती मिळणार असून धार्मिक पर्यटनासह शहराच्या नागरी सुविधांमध्येही मोठा बदल होणार आहे.

या विकास आराखड्यासाठी अक्कलकोट नगरपरिषद, सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय आणि म्हाडा यांनी संयुक्तपणे शासनाकडे सविस्तर प्रस्ताव सादर केला होता. शासनाच्या मंजुरीनंतर मंदिर परिसराच्या नियोजनबद्ध विकासाची प्रक्रिया सुरू होणार आहे. विकास आराखड्यानुसार मंदिर परिसरातील प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण व सुशोभीकरण, आधुनिक वाहनतळांची निर्मिती, पादचारी मार्ग, आरक्षित जागांचा विकास तसेच आवश्यक पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी म्हाडाकडून निधीची तरतूद करण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे.

दोन टप्प्यांत होणार विकास म्हाडाच्या संकल्पनेनुसार अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर परिसराचा विकास दोन टप्प्यांत करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात श्री स्वामी समर्थ मंदिर परिसर आणि श्री स्वामी समर्थ समाधी मठ परिसराचा विकास करण्यात येईल. तर दुसऱ्या टप्प्यात मंदिर ते समाधी मठ या पालखी मार्गाचे सुशोभीकरण व विकास करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे अक्कलकोट शहराचा चेहरामोहरा बदलणार असून भाविकांसाठी आधुनिक आणि सुरक्षित सुविधा उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात विशेष नियोजन प्राधिकरणाबाबतची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित क्षेत्रातील विद्यमान नियोजन प्राधिकरणाचे अधिकार संपुष्टात येतील. त्यानंतर मंदिर परिसराच्या नियोजन, विकास आणि अंमलबजावणीची संपूर्ण जबाबदारी म्हाडाकडे राहणार आहे.

स्वामी समर्थ नगरीला मिळणार आधुनिक रूप ; श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराचा विकास, पालखी मार्गाचे सुशोभीकरण, समाधी मंदिर परिसराचा विकास, शहरातील वाहतूक व्यवस्थेचे आधुनिकीकरण, तलाव व उद्यानांचे संवर्धन तसेच भाविकांसाठी आधुनिक सार्वजनिक सुविधा उभारण्याचा समावेश विकास आराखड्यात करण्यात आला आहे.

“देशभरातून अक्कलकोटला येणाऱ्या लाखो भाविकांना अधिक सुसज्ज, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध होतील. या निर्णयामुळे अक्कलकोटच्या तीर्थक्षेत्र पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, पालकमंत्री जयकुमार गोरे, गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त सचिव असिमकुमार गुप्ता आणि म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जैस्वाल यांचे सहकार्य लाभले.”

— सचिन कल्याणशेट्टी, आमदार, अक्कलकोट

Previous Post

अण्णाभाऊ साठे जयंतीसाठी पोलिसांचा ‘ॲक्शन प्लॅन’!

Next Post

अक्कलकोटला मिळणार अत्याधुनिक न्यायालयीन इमारतीची ‘नवी ओळख’!

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
अक्कलकोटला मिळणार अत्याधुनिक न्यायालयीन इमारतीची ‘नवी ओळख’!

अक्कलकोटला मिळणार अत्याधुनिक न्यायालयीन इमारतीची ‘नवी ओळख’!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In