Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

अण्णाभाऊ साठे जयंतीसाठी पोलिसांचा ‘ॲक्शन प्लॅन’!

Solapur Mirror by Solapur Mirror
July 28, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
अण्णाभाऊ साठे जयंतीसाठी पोलिसांचा ‘ॲक्शन प्लॅन’!

शांतता समिती बैठकीत कडक नियम; ऑनलाईन परवानगी सक्तीची, रात्री १० नंतर साऊंडला ब्रेक

सोलापूर : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेसाठी कडक नियोजन केले आहे. जयंती उत्सव शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडावा यासाठी शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने मंगळवारी शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत उत्सव मंडळांना विविध महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या.

जयंती उत्सवासाठी सर्व मंडळांना ‘आपले सरकार’ पोर्टलद्वारे ऑनलाईन परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच कोणत्याही नागरिकाकडून जबरदस्तीने वर्गणी गोळा करू नये, अशा स्पष्ट सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. मंडप उभारताना आपत्कालीन सेवांसाठी रस्ते मोकळे ठेवणे, सुरक्षेच्या दृष्टीने २४ तास स्वयंसेवकांची नियुक्ती करणे आणि महावितरणकडून अधिकृत वीज जोडणी घेणे आवश्यक राहणार आहे. ९ ऑगस्ट रोजी काढण्यात येणाऱ्या मध्यवर्ती मिरवणुकीतील वाहनांची आरटीओकडून तपासणी करणेही बंधनकारक करण्यात आले आहे.

यंदाच्या जयंती उत्सवात ध्वनिक्षेपकासाठी रात्री १० वाजेपर्यंतच परवानगी देण्यात येणार आहे. मागील वर्षी विशेष बाब म्हणून रात्री १२ वाजेपर्यंत सवलत देण्यात आली होती. मात्र यंदा कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे. या बैठकीला पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर, गुन्हे उपायुक्त अश्विनी पाटील, वाहतूक सहाय्यक आयुक्त सुधीर खिराडकर यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, प्रशासकीय प्रतिनिधी, मातंग समाजातील युवा नेते आणि विविध उत्सव मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डीजेच्या आवाजावर पोलिसांची नजर; नियम मोडल्यास कारवाई
जयंती उत्सवात ‘एक बेस, एक टॉप’ या नियमापेक्षा अधिक आवाज तसेच निर्धारित डेसिबल मर्यादेचे उल्लंघन केल्यास ध्वनी प्रदूषण कायद्यानुसार संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर
शांतता समितीच्या बैठकीत सोशल मीडियावर होणाऱ्या आक्षेपार्ह आणि बदनामीकारक पोस्टचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर पोलिसांनी अफवा पसरविणाऱ्या आणि सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्या पोस्टवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे सांगितले. अशा प्रकारच्या पोस्ट आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आवाहन करण्यात आले.

Previous Post

सोलापूरच्या टॉवेल-चादरींना मिळणार ‘सरकारी’ आधार!

Next Post

अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिराचा होणार ‘कॉरिडॉर’ धर्तीवर कायापालट!

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिराचा होणार ‘कॉरिडॉर’ धर्तीवर कायापालट!

अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिराचा होणार ‘कॉरिडॉर’ धर्तीवर कायापालट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In