Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

बसस्थानकापासून विटभट्ट्यांपर्यंत पोलिओ डोसची व्यवस्था; २८ जूनला जिल्हा आरोग्य विभाची विशेष मोहीम

Solapur Mirror by Solapur Mirror
June 25, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
बसस्थानकापासून विटभट्ट्यांपर्यंत पोलिओ डोसची व्यवस्था; २८ जूनला जिल्हा आरोग्य विभाची विशेष मोहीम

सोलापूर, दि. 23 जून 2026 – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन व मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, जिल्हा परिषद सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबवण्यात येणार आहे. याबाबत माहिती देताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड यांनी सांगितले की, रविवार, दि. 28 जून 2026 रोजी सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून त्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.

सोलापूर जिल्ह्यात एकूण 4,36,572 इतकी 5 वर्षांखालील बालके असून त्यांच्यासाठी ग्रामीण भागात 5,570, शहरी भागात 570 व महानगरपालिका भागात 373 लसीकरण बूथची सोय करण्यात आली आहे. लसीची मात्रा देण्यासाठी 7,222 कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून पर्यवेक्षणासाठी वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हास्तरीय पर्यवेक्षक व तालुकास्तरीय पर्यवेक्षक यांची नेमणूक करण्यात आली आहे. मोहिमेबाबत माहिती देताना अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नंदकिशोर घाडगे यांनी सांगितले की, बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन, बाजार, विटभट्ट्या, साखर कारखाने, यात्रा, लग्न समारंभ या ठिकाणी पोलिओ डोस पाजण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. भटक्या वसाहती व ऊसतोड कामगारांच्या वसाहतीतील बालकांना लस पाजण्यासाठी मोबाईल टीमची सोय करण्यात आली आहे.

मोहिमेच्या कालावधीत 0 ते 5 वयोगटातील एकही लाभार्थी पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी व मोहीम यशस्वी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी यांनी कोल्ड चेन समतोल राखणे, वाहनांची सोय करणे, जनजागृती, प्रचार व प्रसिद्धी करून इतर विभागातील सदस्यांशी समन्वय साधण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सदर मोहीम यशस्वी करण्यासाठी 5 वर्षांखालील सर्व बालकांना पोलिओ लस पाजून घ्यावी व ग्रामस्तरावर शालेय विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरी काढून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेबाबत जनजागृती करण्यात यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

Tags: - जिल्हाधिकारी28 जून 2026एस. कार्तिकेयनकुशल जैनजिल्हा आरोग्य अधिकारीडॉ. सतीश कोपूरवाडमुख्य कार्यकारीराष्ट्रीय पल्स पोलिओ
Previous Post

सोलापूर विद्यापीठ; अहिल्यादेवींच्या स्मारकाचा प्रश्न पुन्हा चर्चेत

Next Post

पाथरूड चौकातील ‘त्या’ कुटुंबाचा महापालिका आवारात आत्मदहनाचा प्रयत्न

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
पाथरूड चौकातील ‘त्या’ कुटुंबाचा महापालिका आवारात आत्मदहनाचा प्रयत्न

पाथरूड चौकातील 'त्या' कुटुंबाचा महापालिका आवारात आत्मदहनाचा प्रयत्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In