Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापूर विद्यापीठ; अहिल्यादेवींच्या स्मारकाचा प्रश्न पुन्हा चर्चेत

Solapur Mirror by Solapur Mirror
June 24, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सोलापूर विद्यापीठ; अहिल्यादेवींच्या स्मारकाचा प्रश्न पुन्हा चर्चेत

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारक उभारणीच्या रखडलेल्या कामावरून सोमवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या बैठकीत सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. वारंवार पाठपुरावा करूनही स्मारकाच्या कामाला गती मिळत नसल्याने सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने ठोस निर्णय घेण्याची मागणी केली.

अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विद्यापीठातच त्यांच्या स्मारकाची उभारणी वर्षानुवर्षे प्रलंबित राहणे योग्य नसल्याचे मत अनेक सदस्यांनी नोंदविले. स्मारक उभारणीचा विषय केवळ बांधकामापुरता मर्यादित नसून तो विद्यापीठाच्या गौरवशाली इतिहासाशी आणि सामाजिक बांधिलकीशी संबंधित असल्याचेही सदस्यांनी स्पष्ट केले.

बैठकीत सदस्य शरू हांडे यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कुलगुरूंसमोर भंडारा उधळून त्यांनी निषेध व्यक्त केला. स्मारकासंदर्भात अनेकदा चर्चा होऊनही प्रत्यक्षात कोणतीही लक्षणीय प्रगती दिसून येत नसल्याबद्दल त्यांनी प्रशासनाकडे जाब विचारला. सदस्यांनी स्मारकाच्या प्रस्तावाची सद्यस्थिती, निधी उपलब्धतेची माहिती, प्रशासकीय व तांत्रिक मंजुरीची प्रक्रिया तसेच काम सुरू होण्याचा निश्चित कालावधी जाहीर करण्याची मागणी केली. याबाबत स्पष्ट आराखडा सादर करण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, विद्यापीठ प्रशासनाने स्मारक उभारणीसंदर्भातील प्रक्रियेचा आढावा घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, अशी भूमिका बैठकीत मांडल्याचे समजते. मात्र, आश्वासनांपलीकडे जाऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होते, याकडे आता विद्यापीठ परिवारासह अहिल्यादेवींच्या अनुयायांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

प्रदूषणाच्या विळख्यात खर्डी; सिताराम शुगर्सविरोधात ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन

Next Post

बसस्थानकापासून विटभट्ट्यांपर्यंत पोलिओ डोसची व्यवस्था; २८ जूनला जिल्हा आरोग्य विभाची विशेष मोहीम

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
बसस्थानकापासून विटभट्ट्यांपर्यंत पोलिओ डोसची व्यवस्था; २८ जूनला जिल्हा आरोग्य विभाची विशेष मोहीम

बसस्थानकापासून विटभट्ट्यांपर्यंत पोलिओ डोसची व्यवस्था; २८ जूनला जिल्हा आरोग्य विभाची विशेष मोहीम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In