Saturday, October 24, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

२६५ तालुक्यांत दुष्काळ; पंचनामे होतील, अहवाल जाईल; शेतकऱ्यांना मदत कधी?

Solapur Mirror by Solapur Mirror
September 26, 2026
in शेती, सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
२६५ तालुक्यांत दुष्काळ; पंचनामे होतील, अहवाल जाईल; शेतकऱ्यांना मदत कधी?
0
SHARES
37
VIEWS

सोलपूर ; राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाल्यानंतर आता शेतकऱ्यांचे लक्ष सरकारकडून मिळणाऱ्या प्रत्यक्ष मदतीकडे लागले आहे. दुष्काळाची घोषणा झाली असली, तरी शेतकऱ्यांच्या हातात आर्थिक मदत कधी पडणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. राज्य सरकारच्या GR मध्ये दुष्काळ जाहीर झाल्यानंतरची पुढील प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली आहे.

दुष्काळ जाहीर झालेल्या 265 तालुक्यांमध्ये सर्वप्रथम पंचनाम्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित जिल्हा प्रशासनाला आता पीक नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी आणि सर्वेक्षण करण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी लागणार आहेविशेष म्हणजे, केवळ पंचनामा करून प्रक्रिया थांबणार नाही. सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांची सद्यस्थिती दर्शविणारे छायाचित्र आणि GPS coordinates संकलित करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या माध्यमातून संबंधित भागातील पीक परिस्थितीची प्रत्यक्ष आणि भौगोलिक माहिती शासनाकडे उपलब्ध होणार आहे.संकलित करण्यात आलेली ही माहिती आणि अहवाल कृषी आयुक्तांमार्फत राज्य शासनाला सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत मिळण्यापूर्वी पंचनामा, सर्वेक्षण, छायाचित्रे आणि GPS आधारित माहिती संकलन अशी प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

आता खरी उत्सुकता आहे ती पंचनामे नेमके कधी पूर्ण होणार आणि मदतीचा मार्ग खुला झाला असला, तरी प्रत्यक्ष आर्थिक मदतीसाठी पुढील प्रशासकीय प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.265 तालुक्यांमध्ये Trigger-1 लागू झाल्यानंतर दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे या तालुक्यांतील शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीत शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. मात्र, मदतीची नेमकी रक्कम, पात्रता आणि वितरणाची तारीख याबाबतचा स्वतंत्र निर्णय होणे आवश्यक आहे.

सरकारच्या निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनाम्याची कार्यवाही तातडीने सुरू केल्यास पुढील प्रक्रिया वेगाने पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंचनामे कधी पूर्ण होतात, पीक नुकसानीचा अहवाल शासनाकडे कधी पोहोचतो आणि त्यानंतर मदतीचा निर्णय कधी होतो, याकडे राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दुष्काळ जाहीर झाला, आता पंचनामे हा पुढचा महत्त्वाचा टप्पा आहे. पंचनामे आणि सर्वेक्षणाचा अहवाल शासनाकडे गेल्यानंतर पीक नुकसानीच्या मदतीबाबत पुढील निर्णय होणार आहे. त्यामुळे ‘मदत कधी मिळणार?’ या शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे पुढील उत्तर आता पंचनाम्याच्या प्रक्रियेतून स्पष्ट होणार आहे.

पुणे महसूल विभाग

पुणे : भोर, वेल्हा, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर (८)

सोलापूर : उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा (११)

सांगली : मिरज, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ (४)
सातारा : सातारा, खटाव, माण, फलटण, खंडाळा, महाबळेश्वर (६)
कोल्हापूर : पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, आजरा, चंदगड (६)

Tags: दुष्काळदेवेंद्र फडणवीसराजकारणसोलापूर
Previous Post

निर्माल्यातून फुलणार वृक्ष; १८०० ‘श्री सदस्यां’चा पर्यावरण जागर

Next Post

कला-संस्कृतीचा जागर; बार्शीत उद्यापासून तरुणाईचा सांस्कृतिक जल्लोष

Related Posts

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सोलापूर जिल्हा

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..
सोलापूर जिल्हा

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

October 22, 2026
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!
सोलापूर जिल्हा

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

October 22, 2026
ब्रेकिंग : शिक्षण विभागात मोठे फेरबदल; दोन उपसंचालकांच्या बदल्या!
सोलापूर जिल्हा

ब्रेकिंग : शिक्षण विभागात मोठे फेरबदल; दोन उपसंचालकांच्या बदल्या!

October 22, 2026
अखेर पदवीधर शिक्षक-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी उद्या विशेष रजा मंजूर!
सोलापूर जिल्हा

अखेर पदवीधर शिक्षक-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी उद्या विशेष रजा मंजूर!

October 22, 2026
उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!
सोलापूर जिल्हा

उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!

October 22, 2026
Next Post
कला-संस्कृतीचा जागर; बार्शीत उद्यापासून तरुणाईचा सांस्कृतिक जल्लोष

कला-संस्कृतीचा जागर; बार्शीत उद्यापासून तरुणाईचा सांस्कृतिक जल्लोष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

October 22, 2026
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

October 22, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In