Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

गोकुळ कारखान्याविरोधातील शेतकऱ्यांचा लढा तीव्र; १२ व्या दिवशीही ठिय्या आंदोलन कायम

Solapur Mirror by Solapur Mirror
June 5, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
गोकुळ कारखान्याविरोधातील शेतकऱ्यांचा लढा तीव्र; १२ व्या दिवशीही ठिय्या आंदोलन कायम

१३० कोटींच्या थकीत ऊसबिलासाठी शेतकरी आक्रमक; सत्ताधारी आमदारांच्या भूमिकेवर नाराजी

सोलापूर, :दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ साखर कारखान्याकडे सुमारे १३० कोटी रुपयांचे ऊसबिल थकीत असल्याने सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. आपल्या कष्टाच्या आणि हक्काच्या पैशांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले बेमुदत ठिय्या आंदोलन १२ व्या दिवशीही तीव्रतेने सुरू असून शेतकऱ्यांनी लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून थकीत ऊसबिलाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी कारखाना प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील सुमारे ५५ ते ६० गावांतील शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले असून, संपूर्ण थकीत रक्कम थेट बँक खात्यात जमा होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, गुरुवारी (दि. ४) शेकडो शेतकऱ्यांनी साखर आयुक्तालयावर अर्धनग्न मोर्चा काढत आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनामुळे ऊसबिलाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गोकुळ साखर कारखाना दक्षिण सोलापूर तालुक्यात असतानाही दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख तसेच अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह सत्ताधारी पक्षातील इतर लोकप्रतिनिधींनी आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. आंदोलनस्थळी अद्याप कोणत्याही सत्ताधारी आमदाराने भेट दिली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.

लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली असली तरी हक्काचे पैसे मिळेपर्यंत संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे अक्कलकोट तालुक्यातील माजी जिल्हा परिषद गटनेते आनंद तानवडे, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य प्रवीण तानवडे तसेच चेन्नई महामार्ग कृषी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे.

आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसमवेत नाश्ता व भोजन करतानाचे त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, या आंदोलनाला विविध स्तरांतून पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान, थकीत ऊसबिलाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

Previous Post

शेतीपंपांना पूर्ववत वीज द्या; शेतकऱ्यांचा अंत पाहू नका : खासदार प्रणिती शिंदे

Next Post

सोलापूरात शिवराज्याभिषेक दिन शिवरायांच्या जयघोषात निनादले सोलापूर..

Related Posts

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी
सोलापूर जिल्हा

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

September 7, 2026
पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
Next Post
सोलापूरात शिवराज्याभिषेक दिन शिवरायांच्या जयघोषात निनादले सोलापूर..

सोलापूरात शिवराज्याभिषेक दिन शिवरायांच्या जयघोषात निनादले सोलापूर..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

September 7, 2026
पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In