Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

शेअर बाजाराच्या फटक्याने मुख्याध्यपकाने पत्नी व दोन मुलांसह संपवले जीवन

Solapur Mirror by Solapur Mirror
June 12, 2026
in Uncategorized
0
शेअर बाजाराच्या फटक्याने मुख्याध्यपकाने पत्नी व दोन मुलांसह संपवले जीवन
0
SHARES
14
VIEWS

२२ पानी चिठ्ठीत आर्थिक नुकसानीची व्यथा; वैरागजवळील हत्तीज येथील हृदयद्रावक घटना

सोलापूर : शेअर बाजारातील मोठ्या आर्थिक नुकसानीमुळे कर्जाच्या गर्तेत अडकलेल्या एका मुख्याध्यापकाने पत्नी आणि दोन मुलांना विष देऊन त्यानंतर स्वतःही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बार्शी तालुक्यातील वैरागजवळील हत्तीज येथे उघडकीस आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण सोलापूर जिल्हा हळहळला असून, आर्थिक तणावाचे भयावह परिणाम पुन्हा एकदा समोर आले आहेत.

योगेश बाळासाहेब पाटील (वय ४१) हे नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. प्राथमिक तपासानुसार, शेअर बाजारातील गुंतवणुकीत सातत्याने तोटा झाल्याने त्यांच्यावर सुमारे १ कोटी ८० लाख रुपयांचे कर्ज झाले होते. नातेवाईक आणि परिचितांकडून घेतलेल्या पैशांची परतफेड करण्याचा वाढता ताण आणि आर्थिक विवंचना यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, योगेश पाटील यांनी प्रथम पत्नी माधुरी पाटील, मोठा मुलगा अथर्व आणि धाकटा मुलगा शिवांश यांना विष दिले. त्यानंतर स्वतःही विष प्राशन करून गळफास घेतल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाल्याने हत्तीज गावासह संपूर्ण बार्शी तालुक्यावर शोककळा पसरली आहे. घटनास्थळी पोलिसांना योगेश पाटील यांनी लिहिलेली २२ पानांची सविस्तर चिठ्ठी मिळाली आहे. या चिठ्ठीत शेअर बाजारातील व्यवहार, झालेला आर्थिक तोटा, वाढते कर्ज, उसनवारीचे पैसे फेडता न आल्याची खंत आणि मानसिक तणाव यांचा उल्लेख असल्याची माहिती पोलिसांनी दिली. चिठ्ठीतील मजकुराचा सखोल तपास सुरू असून, वैराग पोलीस पुढील तपास करीत आहेत.

उन्हाळी सुट्टीनिमित्त योगेश पाटील हे कुटुंबासह मूळ गावी आले होते. त्यांचे वडील दिवंगत झाले असून आई हयात आहे. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी आईची माफी मागितल्याचेही समोर आले आहे. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीचा प्रवास, त्यातून झालेले नुकसान आणि त्यानंतरची आर्थिक घुसमट याबाबत त्यांनी सविस्तर माहिती नमूद केली असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

  • २२ पानी चिठ्ठी पोलिसांच्या हाती
  • घटनेपूर्वी योगेश पाटील यांनी २२ पानांची सविस्तर चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात शेअर बाजारातील व्यवहार, आर्थिक नुकसान, वाढते कर्ज आणि कर्जफेडीची असमर्थता याबाबत उल्लेख करण्यात आला आहे. चिठ्ठीचा तपास सुरू असून अनेक बाबींचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
Previous Post

दिवस-रात्र घरफोड्या करणारा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार जेरबंद

Next Post

बार असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी चुरस वाढली; फताटे-पाटील चर्चेच्या केंद्रस्थानी

Related Posts

आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज!
Uncategorized

आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज!

July 19, 2026
सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात
Uncategorized

सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात

July 11, 2026
शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा
Uncategorized

शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा

June 24, 2026
‘एकही मत वाया नको’ : राजाभाऊंच्या विजयासाठी शिंदेंचे दूत सोलापुरात सक्रिय
Uncategorized

‘एकही मत वाया नको’ : राजाभाऊंच्या विजयासाठी शिंदेंचे दूत सोलापुरात सक्रिय

June 18, 2026
मतदानात ‘उत्तर सोलापूर’ अव्वल तर ‘पंढरपूर’ संथ; पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ११.८५ टक्के मतदान
Uncategorized

मतदानात ‘उत्तर सोलापूर’ अव्वल तर ‘पंढरपूर’ संथ; पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ११.८५ टक्के मतदान

June 18, 2026
पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत
Uncategorized

पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत

June 15, 2026
Next Post
बार असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी चुरस वाढली; फताटे-पाटील चर्चेच्या केंद्रस्थानी

बार असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी चुरस वाढली; फताटे-पाटील चर्चेच्या केंद्रस्थानी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
“करिअरची खात्री, गुणवत्तेची हमी; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढती पसंती”

“करिअरची खात्री, गुणवत्तेची हमी; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढती पसंती”

July 26, 2026
आईने १४ वर्षीय मुलीसह रेल्वेखाली झोकून दिले जीवन

आईने १४ वर्षीय मुलीसह रेल्वेखाली झोकून दिले जीवन

July 26, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025