Friday, October 23, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

घरकुलांची कामे रखडली, तर अधिकाऱ्यांची खैर नाही ; सीईओ कुशल जैन

Solapur Mirror by Solapur Mirror
October 15, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
घरकुलांची कामे रखडली, तर अधिकाऱ्यांची खैर नाही ; सीईओ कुशल जैन
0
SHARES
5
VIEWS

सोलापूर, : शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचला पाहिजे. विशेषतः गोरगरीब लाभार्थ्यांच्या घरकुलांची कामे रखडता कामा नयेत. मंजूर घरकुले निर्धारित मुदतीत पूर्ण करा, प्रलंबित प्रस्तावांचा तातडीने निपटारा करा आणि विकासकामांच्या अंमलबजावणीत कोणतीही हयगय करू नका, अशा स्पष्ट सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिल्या. कामांमध्ये दिरंगाई अथवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत घरकुल योजना, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान, दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना, जनावरांसाठी चारा व पाण्याची उपलब्धता, तलावांतील पाणीसाठा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, शाळा आणि ग्रामपंचायत विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

ग्रामीण भागातील गरजू आणि पात्र कुटुंबांना हक्काचे घर मिळावे, हा घरकुल योजनेचा प्रमुख उद्देश आहे. मात्र, मंजुरी मिळाल्यानंतरही काही प्रकरणांमध्ये विविध कारणांमुळे कामे प्रलंबित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने विशेष दक्षता घेण्याची गरज जैन यांनी अधोरेखित केली. पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ वेळेत मिळावा, मंजूर घरकुलांचे बांधकाम निर्धारित कालावधीत पूर्ण व्हावे आणि प्रलंबित प्रस्तावांचा तातडीने निपटारा व्हावा, यासाठी ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामसेवकांनी प्राधान्याने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

या वेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) सूर्यकांत भुजबळ, दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत, सहाय्यक गटविकास अधिकारी सनी चव्हाण, बांधकाम विभागाचे उपअभियंता विशाल लेंगरे, लघुपाटबंधारे विभागाचे उपअभियंता मुजावर, ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता दत्तात्रय सोनवणे, गटशिक्षणाधिकारी जयश्री सुतार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नीलम घोगरे यादव यांच्यासह सर्व विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्रामसेवक उपस्थित होते

Tags: जिल्हा परिषददेवेंद्र फडणवीससूर्यकांत भुजबळसोलापूर
Previous Post

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी ; झेडपीच्या पद अधिकाऱ्यांनी सोडले मानधन

Next Post

मागास समाज सेवा मंडळाच्या अध्यक्षपदी सुभाष चव्हाण यांची विशेष निवड!

Related Posts

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सोलापूर जिल्हा

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..
सोलापूर जिल्हा

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

October 22, 2026
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!
सोलापूर जिल्हा

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

October 22, 2026
ब्रेकिंग : शिक्षण विभागात मोठे फेरबदल; दोन उपसंचालकांच्या बदल्या!
सोलापूर जिल्हा

ब्रेकिंग : शिक्षण विभागात मोठे फेरबदल; दोन उपसंचालकांच्या बदल्या!

October 22, 2026
अखेर पदवीधर शिक्षक-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी उद्या विशेष रजा मंजूर!
सोलापूर जिल्हा

अखेर पदवीधर शिक्षक-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी उद्या विशेष रजा मंजूर!

October 22, 2026
उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!
सोलापूर जिल्हा

उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!

October 22, 2026
Next Post
मागास समाज सेवा मंडळाच्या अध्यक्षपदी सुभाष  चव्हाण यांची  विशेष निवड!

मागास समाज सेवा मंडळाच्या अध्यक्षपदी सुभाष चव्हाण यांची विशेष निवड!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

October 22, 2026
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

October 22, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In