सोलापूर विजापूर रोड सोलापूर नेहरूनगर येथील सोलापूर मागास समाज सेवा मंडळाच्या अध्यक्षपदी सुभाष चंद्रराम चव्हाण यांची एक मतांनी निवड करण्यात आली आहे. मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून, विविध पदाधिकारी आणि संचालकांवर समाजाच्या विकासाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या निवडीमुळे मंडळाच्या आगामी सामाजिक, शैक्षणिक आणि समाजहिताच्या कार्याला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या सुभाष चंद्रराम चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली समाजातील विविध घटकांना एकत्र आणणे, शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देणे, सामाजिक बांधिलकी जपणे आणि समाजाच्या उन्नतीसाठी विधायक उपक्रम राबविणे, यावर भर दिला जाणार आहे. समाजातील गरजू घटकांना मदत, युवकांना प्रोत्साहन आणि सामाजिक एकोपा वाढविण्यासाठी मंडळाच्या माध्यमातून प्रयत्न होण्याची अपेक्षा आहे.
नूतन संचालक मंडळात महिलांचाही उल्लेखनीय सहभाग : मंडळाच्या नूतन कार्यकारिणीत महिला व पुरुष सदस्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये पूजा विवेक चव्हाण, पार्वती लोकुराम राठोड, नामदेव कणिराम चव्हाण, राजश्री चव्हाण, पृथ्वीराज विजयलाल चव्हाण, विजयरत्न गोरखनाथ चव्हाण, रविंद्र गोरखनाथ चव्हाण, कार्तिक सुभाष चव्हाण, विवेक सुभाष चव्हाण, लक्ष्मीदेवी नामदेव चव्हाण, नलिनी अनिल राठोड, कांचन विजयलाल चव्हाण, प्रगती कार्तिक चव्हाण, पौर्णिमा सुभाष चव्हाण, रोहित रविंद्र चव्हाण, धनंजय लक्ष्मण सागर, संजीव रेवणसिद्धप्पाडोपरे , आकाश नामदेव चव्हाण, संजय लोकुराम राठोड आणि भिमू भैरू राठोड यांचा समावेश आहे.
नूतन कार्यकारिणीच्या माध्यमातून मागास समाज सेवा मंडळाचे कार्य अधिक व्यापक व्हावे, समाजातील विविध प्रश्नांना सकारात्मक दिशा मिळावी आणि सामाजिक विकासासाठी सातत्याने प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अध्यक्ष सुभाष चंद्रराव चव्हाण यांच्यासह सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालकांवर समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी राहणार आहे.मंडळाच्या नूतन कार्यकारिणीचे विविध स्तरांतून अभिनंदन होत असून, आगामी काळात समाजहिताचे उपक्रम प्रभावीपणे राबविण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.