Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

एक क्लिक… आणि बदलाचा इतिहास कायमचा जिवंत! महापौर विनायक कोंड्याल

Solapur Mirror by Solapur Mirror
August 19, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
एक क्लिक… आणि बदलाचा इतिहास कायमचा जिवंत! महापौर विनायक कोंड्याल

सोलापूर : छायाचित्रकारांनी टिपलेल्या छायाचित्रांमधून एखाद्या परिसरातील विकासाचा पूर्वीचा आणि आताचा बदल नागरिकांच्या नजरेसमोर प्रभावीपणे मांडता येतो. छायाचित्रांमुळे हा बदल लोकांच्या स्मरणात कायम राहतो आणि त्याचा मोठा फायदा होतो, असे प्रतिपादन महापौर विनायक कोंड्याल यांनी केले.

सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि एस. पी. सिक्युरिटी सर्विसेस यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त छायाचित्रकार व कॅमेरामन यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर कोंड्याल बोलत होते. विचारमंचावर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार, वै. वा. ह.भ.प. धोंडोपंत दादा यांच्या भजनी सांप्रदायिक फडाचे अध्यक्ष नारायण सुरवसे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे, फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष संदीप वाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन छायाचित्रकारांचा सन्मान करण्यात आला.

महापौर कोंड्याल म्हणाले, जगात घडणाऱ्या घटना आणि त्यामधील सातत्य समाजासमोर आणण्याचे काम पत्रकारिता करते. त्याचप्रमाणे छायाचित्रकार आपल्या कॅमेऱ्यातून या घटना आणि क्षण कायमस्वरूपी जतन करतात. त्यामुळे पत्रकारितेसोबत छायाचित्रकारांचेही महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपल्या राजकीय प्रवासातील अनुभव सांगताना कोंड्याल म्हणाले की, २००७ मध्ये अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर आपल्या प्रभागात मोठ्या प्रमाणावर विकासकामे करण्यात आली. त्यावेळी छायाचित्रकारांनी टिपलेली प्रभागाची जुनी छायाचित्रे २०१२ च्या निवडणुकीत नागरिकांना दाखवून पूर्वीचा आणि नंतरचा बदल समोर ठेवता आला. फोटोमधील हा फरक नागरिकांच्या स्मरणात ठसला आणि त्याचा मला दुसऱ्यांदा निवडून येताना फायदा झाला, असे त्यांनी सांगितले. छायाचित्रकार हे इतिहासाचे साक्षीदार असून, त्यांनी टिपलेला प्रत्येक महत्त्वाचा क्षण पुढील पिढ्यांसाठी मौल्यवान ठरतो, असे कोंड्याल यांनी नमूद केले.

प्रास्ताविक श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी केले. सूत्रसंचालन लखन आदाटे यांनी केले. सरचिटणीस सागर सुरवसे यांनी आभार मानले. यावेळी विविध वृत्तपत्र, वृत्तवाहिनींचे छायाचित्रकार आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छायाचित्र व्यक्तींचे कार्य, इतिहास जिवंत ठेवते : इंद्रजीत पवार; जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी जुन्या छायाचित्राचे महत्त्व सांगताना एका ऐतिहासिक पुतळ्याच्या उद्घाटनाची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी छायाचित्राचा उपयोग झाल्याचा अनुभव सांगितला. माणूस काळाच्या पडद्याआड गेला तरी छायाचित्र त्याचे कार्य आणि इतिहास जिवंत ठेवते. फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यामागे एक संवेदनशील पत्रकार दडलेला असतो, असे ते म्हणाले.

छायाचित्रकार हा इतिहासाचा साक्षीदार : नारायण सुरवसे : नारायण सुरवसे म्हणाले, छायाचित्रकाराचे काम ‘दृश्य, द्रष्टा आणि दर्शक’ या त्रिपुटीशी जोडले. एआयच्या युगात मूळ आणि बदललेले छायाचित्र ओळखणे हे मोठे आव्हान असून, सत्यता व विश्वासार्हता जपण्याची जबाबदारी छायाचित्रकारांची आहे. छायाचित्रकार हा क्षण टिपतो. इतिहासाचा साक्षीदार बनतो. ——

Previous Post

बापु तुमचं काम केलं नाही असं कधी झालंय का ; शिक्षण मंत्र्यांची आ.सुभाष देशमुखांना अशीही गाव्ही

Next Post

शतकभराची श्रद्धा, परंपरेचा जागर; मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमेला सुरुवात !

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
शतकभराची श्रद्धा, परंपरेचा जागर; मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमेला सुरुवात !

शतकभराची श्रद्धा, परंपरेचा जागर; मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमेला सुरुवात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In