Saturday, October 24, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

मनपाच्या उत्पन्नाला ‘थकबाकी’चा ब्रेक; वसुलीला गती ; महापौर कोंड्याल

Solapur Mirror by Solapur Mirror
October 1, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
मनपाच्या उत्पन्नाला ‘थकबाकी’चा ब्रेक; वसुलीला गती ; महापौर कोंड्याल
0
SHARES
10
VIEWS

मनपाच्या गाळ्यांची थकबाकी वसुली ‘फास्ट ट्रॅक’वर आणा !

सोलापूर. महापालिकेच्या मालकीच्या मिनी आणि मेजर गाळ्यांकडील थकीत भाडे, लँड फी तसेच अन्य देयकांच्या वसुलीला आता गती दिली जाणार आहे. कोणत्या गाळेधारकाकडे किती थकबाकी आहे, आतापर्यंत किती रक्कम वसूल झाली आणि किती वसुली प्रलंबित आहे, याची अद्ययावत माहिती तयार करून नियोजनबद्ध पद्धतीने वसुली मोहीम राबविण्याचे निर्देश महापौर विनायक कोंड्याल यांनी मालमत्ता विभागाला दिले.

महापालिकेच्या मालमत्ता विभागाच्या कामकाजासह शहरातील विविध भागांतील मिनी व मेजर गाळ्यांच्या वसुलीचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी कौन्सिल हॉलमध्ये महापौर कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी गाळ्यांचे थकीत भाडे, लँड फी आणि इतर देयकांच्या सद्यस्थितीचा विभागनिहाय आढावा घेण्यात आला. शहरातील विविध भागांत महापालिकेच्या मालकीचे गाळे असून, त्यातून मिळणारा महसूल महापालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत आहे. त्यामुळे या मालमत्तांमधून मिळणाऱ्या उत्पन्नाची नियमित आणि वेळेत वसुली होणे आवश्यक असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. थकबाकी वाढत राहिल्यास त्याचा परिणाम महापालिकेच्या उत्पन्नावर होत असल्याने प्रलंबित वसुलीकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

प्रत्येक गाळेधारकाची थकबाकी, केलेली वसुली आणि शिल्लक रक्कम यांची स्वतंत्र व अद्ययावत नोंद ठेवावी. दीर्घकाळापासून थकबाकी असलेल्या प्रकरणांचा प्राधान्याने आढावा घेऊन नियमानुसार आवश्यक कार्यवाही करावी. वसुलीची प्रक्रिया केवळ कागदोपत्री न ठेवता त्यासाठी प्रभावी नियोजन करून प्रलंबित प्रकरणे वेगाने निकाली काढावीत, असे निर्देश महापौरांनी दिले.महापालिकेच्या मालकीच्या मालमत्तांचे योग्य व्यवस्थापन करून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. मालमत्ता विभागाशी संबंधित विविध प्रलंबित बाबींचा विभागनिहाय आढावा घेऊन त्यावर कालबद्ध पद्धतीने कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, सभागृहनेते नरेंद्र काळे, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, माजी महापौर तथा नगरसेविका श्रीकांचना यन्नम, नगरसेवक गौतम कसबे, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, सहायक आयुक्त विनोद कुलकर्णी, कार्यालय अधीक्षक प्रशांत जाधव यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Tags: आयुक्त डॉ. सचिन ओम्बासेउपमहापौर ज्ञानेश्वरी देवकरमहापौरसभागृहनेते नरेंद्र काळेसभापती रंजिता चाकोतेसोलापूर महापालिका
Previous Post

जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी तजमुल मुतवल्ली निवड

Next Post

खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांची यमाई उद्योग समूहाला सदिच्छा भेट

Related Posts

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सोलापूर जिल्हा

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..
सोलापूर जिल्हा

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

October 22, 2026
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!
सोलापूर जिल्हा

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

October 22, 2026
ब्रेकिंग : शिक्षण विभागात मोठे फेरबदल; दोन उपसंचालकांच्या बदल्या!
सोलापूर जिल्हा

ब्रेकिंग : शिक्षण विभागात मोठे फेरबदल; दोन उपसंचालकांच्या बदल्या!

October 22, 2026
अखेर पदवीधर शिक्षक-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी उद्या विशेष रजा मंजूर!
सोलापूर जिल्हा

अखेर पदवीधर शिक्षक-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी उद्या विशेष रजा मंजूर!

October 22, 2026
उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!
सोलापूर जिल्हा

उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!

October 22, 2026
Next Post
खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांची यमाई उद्योग समूहाला सदिच्छा भेट

खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांची यमाई उद्योग समूहाला सदिच्छा भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

October 22, 2026
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

October 22, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In