राज्यसभेवर निवडीनंतर प्रथमच आगमन; सामाजिक व सार्वजनिक विषयांवर साधला संवाद
सोलापूर, राज्यसभा खासदारपदी निवड झाल्यानंतर डॉ. ज्योती वाघमारे यांनी प्रथमच सोलापुरातील यमाई उद्योग समूहाच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच राज्यसभेतील आगामी कार्यकाळासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
डॉ. वाघमारे यांच्या आगमनानिमित्त यमाई उद्योग समूहाच्या कार्यालयात त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी विविध सामाजिक आणि सार्वजनिक विषयांवर स्नेहपूर्ण संवाद साधण्यात आला. राज्यसभेच्या माध्यमातून जनतेच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्याबरोबरच सोलापूरसह राज्यातील जनहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडावेत, अशा शुभेच्छा उपस्थितांनी दिल्या.डॉ. वाघमारे यांच्यावर राज्यसभा खासदार म्हणून आलेली जबाबदारी महत्त्वाची असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी उपस्थितांनी सदिच्छा व्यक्त केल्या. विविध क्षेत्रांतील प्रश्न, विकासाशी निगडित विषय आणि सामाजिक प्रश्नांवरही यावेळी चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी यमाई उद्योग समूहाच्या वतीने डॉ. ज्योती वाघमारे यांचे अभिनंदन करून राज्यसभेतील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी सोलापूर जिल्हा परिषेदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार ,यमाई उद्योग समूहाचे शाहजी पवार उपस्थिती होते