Saturday, October 24, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

“नानांचा आवाज थांबला… पडदा मात्र डोळ्यांत राहिला!”

Solapur Mirror by Solapur Mirror
October 8, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
“नानांचा आवाज थांबला… पडदा मात्र डोळ्यांत राहिला!”
0
SHARES
15
VIEWS

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गोव्यात निधन; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सोलापूर | प्रतिनिधी : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील आपल्या दमदार अभिनयाने, भारदस्त आवाजाने आणि आगळ्या संवादफेकीने लाखो रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवारी (८ ऑक्टोबर) पहाटे गोव्यात निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी नाना पाटेकर बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना तातडीने मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सुमारे ४५ मिनिटे त्यांना सीपीआर देऊन पुनरुज्जीवित करण्याचे प्रयत्न केले; मात्र उपचारांना प्रतिसाद मिळाला नाही. पहाटे सुमारे ५.२० वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी मेडिको-लीगल केस नोंदवण्यात आली असून पुढील वैद्यकीय प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

पाच दशकांचा अभिनयप्रवास संपला‘ गमन’पासून सुरू झालेल्या नाना पाटेकर यांच्या अभिनय कारकिर्दीने मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतंत्र ठसा उमटवला. ‘परिंदा’, ‘क्रांतिवीर’, ‘प्रहार’, ‘तिरंगा’, ‘अग्निसाक्षी’, ‘अब तक छप्पन’, ‘वेलकम’ आणि ‘नटसम्राट’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. गंभीर भूमिका असो, खलनायकाची भूमिका असो किंवा विनोदी व्यक्तिरेखा—नानांनी प्रत्येक भूमिकेला आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीने वेगळी ओळख दिली.

अभिनयासोबत समाजसेवेचीही ओळख : नाना पाटेकर हे केवळ अभिनेते म्हणूनच नव्हे, तर सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणूनही परिचित होते. मकरंद अनासपुरे यांच्या सहकार्याने स्थापन केलेल्या ‘नाम फाउंडेशन’ च्या माध्यमातून त्यांनी शेतकरी, दुष्काळ आणि ग्रामीण भागातील विविध प्रश्नांवर काम केले. पाणी संवर्धनासह शेतकरी कुटुंबांना मदतीचा हात देण्याचे काम त्यांनी केले.नाना पाटेकर यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीने एक प्रतिभावान, संवेदनशील आणि प्रभावी कलाकार गमावला आहे. त्यांच्या दमदार संवादफेकीपासून ते ‘नटसम्राट’मधील अविस्मरणीय अभिनयापर्यंतचा त्यांचा प्रवास कायम स्मरणात राहणार आहे. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण असल्याची भावना चित्रपटसृष्टीसह त्यांच्या असंख्य चाहत्यांकडून व्यक्त होत आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली! ॐ शांती.

Tags: क्रांतिवीरज्येष्ठ अभिनेतेतिरंगानटसम्राटनाना पाटेकरनाम फाउंडेशनप्रिया बापटमकरंद अनासपुरेलता मंगेशकर
Previous Post

पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी सोलापूर ‘रेडी’!

Next Post

मस्टरचा खेळ बंद! आता बायोमेट्रिकवरच हजेरीचा हिशोब :अक्षय अंजीखाने आयुक्तांना पत्र..

Related Posts

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सोलापूर जिल्हा

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..
सोलापूर जिल्हा

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

October 22, 2026
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!
सोलापूर जिल्हा

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

October 22, 2026
ब्रेकिंग : शिक्षण विभागात मोठे फेरबदल; दोन उपसंचालकांच्या बदल्या!
सोलापूर जिल्हा

ब्रेकिंग : शिक्षण विभागात मोठे फेरबदल; दोन उपसंचालकांच्या बदल्या!

October 22, 2026
अखेर पदवीधर शिक्षक-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी उद्या विशेष रजा मंजूर!
सोलापूर जिल्हा

अखेर पदवीधर शिक्षक-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी उद्या विशेष रजा मंजूर!

October 22, 2026
उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!
सोलापूर जिल्हा

उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!

October 22, 2026
Next Post
मस्टरचा खेळ बंद! आता बायोमेट्रिकवरच हजेरीचा हिशोब :अक्षय अंजीखाने आयुक्तांना पत्र..

मस्टरचा खेळ बंद! आता बायोमेट्रिकवरच हजेरीचा हिशोब :अक्षय अंजीखाने आयुक्तांना पत्र..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

October 22, 2026
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

October 22, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In