Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

‘असा उपमहापौर यापूर्वी पाहिलाच नाही!’; ज्ञानेश्वरी देवकर यांच्या जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद..

Solapur Mirror by Solapur Mirror
August 25, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
‘असा उपमहापौर यापूर्वी पाहिलाच नाही!’; ज्ञानेश्वरी देवकर यांच्या जनता दरबाराला  उत्स्फूर्त प्रतिसाद..

फोनवरून अधिकाऱ्यांना सूचना; समस्या ऐकताच कार्यवाही सुरू — ‘असा उपमहापौर यापूर्वी पाहिला नाही’, नागरिकांतून कौतुकाचा सूर

सोलापूर : हद्दवाढ भागातील नागरिकांच्या वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या नागरी प्रश्नांना थेट व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या अडचणींचा तातडीने निपटारा व्हावा, यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या कार्यालयात दर मंगळवारी जनता दरबार आयोजित केला जात आहे. या उपक्रमाला हद्दवाढ भागातून मोठा प्रतिसाद मिळत असून, नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना थेट फोन करून सूचना देत त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचा प्रयत्न उपमहापौर देवकर करीत आहेत.

हद्दवाढ भागातील नागरिकांना पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, पथदिवे तसेच विविध नागरी सुविधांशी संबंधित अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्या घेऊन नागरिक जनता दरबारात येत असून, प्रत्येक तक्रार ऐकून घेण्यासोबतच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी तत्काळ संपर्क साधला जात आहे. अनेक वेळा नागरिकांसमोरच फोन करून समस्या सोडविण्याच्या दृष्टीने आवश्यक सूचना दिल्या जात असल्याने नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण होत आहे.विशेष म्हणजे, केवळ तक्रारी ऐकून घेण्यापुरता जनता दरबार मर्यादित न ठेवता त्यावर प्रत्यक्ष कार्यवाही व्हावी, यासाठी उपमहापौर देवकर स्वतः पाठपुरावा करीत आहेत. नागरिकांनी समस्या मांडल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरून सूचना देणे आणि प्रश्नाच्या निवारणासाठी पाठपुरावा करण्याची त्यांची कार्यपद्धती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

“आमच्या भागातील अनेक समस्या घेऊन आम्ही आलो होतो. मात्र, उपमहापौरांनी समस्या शांतपणे ऐकून घेतल्या आणि त्याचवेळी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून सूचना दिल्या. यापूर्वी अशा पद्धतीने नागरिकांच्या समस्या तातडीने ऐकून घेणारा आणि त्यावर लगेच कार्यवाही करण्याचा प्रयत्न करणारा उपमहापौर पाहिला नाही,” अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या या कार्यपद्धतीचे नागरिकांकडून कौतुक होत असून, “त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे,” असा सूर हद्दवाढ भागातील नागरिकांमध्ये उमटत आहे.

महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रश्नांना थेट प्रतिसाद देत असल्याने जनता दरबार हा हद्दवाढ भागासाठी प्रभावी तक्रार निवारणाचा मंच ठरत असल्याचे चित्र आहे.दर मंगळवारी होणाऱ्या या जनता दरबारामुळे महापालिका आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक थेट होत असून, हद्दवाढ भागातील नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर तातडीने मार्ग काढण्याचा उपमहापौर देवकर यांचा प्रयत्न कायम राहणार असल्याने आगामी काळात या जनता दरबारातून आणखी किती प्रश्न मार्गी लागतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Tags: आयुक्तउपमहापौरजनता दरबारजुळे सोलापूरज्ञानेश्वरी देवकरप्रभाग क्र.23मनोज देवकरमहेश देवकरसोलापूर महानगरपालिकाहद्दवाढ भाग
Previous Post

चिमुकल्यांच्या नजरेवर शासनाची नजर; ३६ महिने दृष्टी तपासणी अभियान

Next Post

शालार्थ आयडी प्रकरण ; बोगस शालार्थ वाल्यांचे धाबे दणाणले; एसआयटीचा तपास आणखी तीन महिने

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
शालार्थ आयडी प्रकरण ; बोगस शालार्थ वाल्यांचे धाबे दणाणले; एसआयटीचा तपास आणखी तीन महिने

शालार्थ आयडी प्रकरण ; बोगस शालार्थ वाल्यांचे धाबे दणाणले; एसआयटीचा तपास आणखी तीन महिने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In