Sunday, October 25, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

कंटेनरखाली घुसली स्कॉर्पिओ; मोहोळच्या तरुणाचा दुर्दैवी अंत

Solapur Mirror by Solapur Mirror
September 21, 2026
in क्राईम, सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
कंटेनरखाली घुसली स्कॉर्पिओ; मोहोळच्या तरुणाचा दुर्दैवी अंत
0
SHARES
92
VIEWS

पुणे-सोलापूर महामार्गावर सापटणेजवळ भीषण अपघात; दोन तरुण गंभीर जखमी

सोलापुर ; पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सापटणे गावाच्या हद्दीत एचपी पेट्रोल पंपाजवळ सोमवारी (दि. २१) दुपारी भीषण अपघात झाला. मोहोळहून टेंभुर्णीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या महिंद्रा स्कॉर्पिओने पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर स्कॉर्पिओचा पुढील भाग कंटेनरखाली घुसून चक्काचूर झाला. या अपघातात मोहोळ येथील कर्ण महेश पवार (वय २३) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून अनिकेत लक्ष्मण धोत्रे (वय २३) आणि रोहित विजय मोरे (वय २१) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास स्कॉर्पिओ क्रमांक MH 42 BN 5112 मोहोळहून टेंभुर्णीच्या दिशेने जात होती. सापटणे गावाच्या हद्दीत एचपी पेट्रोल पंपाजवळ पुढे पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या TS 08 UB 4478 क्रमांकाच्या कंटेनरला स्कॉर्पिओने पाठीमागून जोरदार धडक दिली.

धडक एवढी भीषण होती की स्कॉर्पिओचा पुढील भाग कंटेनरखाली अडकला. वाहनाचा पुढील भाग अक्षरशः चक्काचूर झाला आणि त्यातील तिन्ही तरुण वाहनातच अडकून पडले. अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोलनाका येथील गस्तीपथक व महामार्ग पोलिस मदत केंद्राचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त स्कॉर्पिओ कंटेनरखाली अडकल्याने जखमींना बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. वरवडे टोल नाका येथील क्रेनच्या सहाय्याने वाहन कंटेनरखालून बाजूला काढण्यात आले. त्यानंतर स्कॉर्पिओचे दरवाजे तोडून गंभीर अवस्थेतील तिन्ही तरुणांना बाहेर काढण्यात आले.

जखमींपैकी दोघांना वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिकेतून डॉ. प्रशांत कारंजकर व रुग्णवाहिकाचालक सागर फाटे यांनी तातडीने उपचारासाठी टेंभुर्णी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तर एका गंभीर जखमीला वेणेगाव येथील जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिजधामच्या रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघातात डोक्याला, पायाला व पोटाला जबर मार लागल्याने कर्ण महेश पवार (वय २३, रा. मोहोळ) हा गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर टेंभुर्णी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मोहोळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, अनिकेत लक्ष्मण धोत्रे (वय २३) आणि रोहित विजय मोरे (वय २१) हे दोघेही गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल नाका येथील गस्तीपथकाचे प्रमुख संतोष खडके , चालक अभिजीत गुजरे सहाय्यक नवनाथ मोरे तसेच मोडनिंब महामार्ग पोलिस मदत केंद्राचे PSI किरण आवताडे पोहेकॉ सचिन आतकर, पोना सुनील माने, पोहेकॉ हनुमंत चौधरी व पोहेकॉ पांडुरंग जगताप यांनी घटनास्थळी धाव घेतली. गस्तीपथकाने क्रेनच्या सहाय्याने वाहन बाजूला काढून जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोचविण्यास मदत केली. या अपघाताची माहिती टेंभुर्णी पोलिस ठाण्यातील अपघात विभागाचे अधिकारी जगताप यांना गस्तीपथकाचे प्रमुख संतोष खडके यांनी दिली. अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.

Previous Post

मान्यतेच्या संचिकांची आता होणार छाननी; शिक्षकांच्या संचिका तातडीने मागविल्या..

Next Post

पिस्तूल-काडतुसे, तलवारी अन् खंजीर; गुन्हे शाखेचा सर्जिकल स्ट्राईक!

Related Posts

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सोलापूर जिल्हा

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..
सोलापूर जिल्हा

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

October 22, 2026
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!
सोलापूर जिल्हा

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

October 22, 2026
ब्रेकिंग : शिक्षण विभागात मोठे फेरबदल; दोन उपसंचालकांच्या बदल्या!
सोलापूर जिल्हा

ब्रेकिंग : शिक्षण विभागात मोठे फेरबदल; दोन उपसंचालकांच्या बदल्या!

October 22, 2026
अखेर पदवीधर शिक्षक-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी उद्या विशेष रजा मंजूर!
सोलापूर जिल्हा

अखेर पदवीधर शिक्षक-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी उद्या विशेष रजा मंजूर!

October 22, 2026
उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!
सोलापूर जिल्हा

उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!

October 22, 2026
Next Post
पिस्तूल-काडतुसे, तलवारी अन् खंजीर; गुन्हे शाखेचा सर्जिकल स्ट्राईक!

पिस्तूल-काडतुसे, तलवारी अन् खंजीर; गुन्हे शाखेचा सर्जिकल स्ट्राईक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

October 22, 2026
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

October 22, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In