Sunday, October 25, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

मान्यतेच्या संचिकांची आता होणार छाननी; शिक्षकांच्या संचिका तातडीने मागविल्या..

Solapur Mirror by Solapur Mirror
September 21, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
मान्यतेच्या संचिकांची आता होणार छाननी; शिक्षकांच्या संचिका तातडीने मागविल्या..
0
SHARES
13
VIEWS

सोलापूर, राज्यातील विविध ठिकाणी शालार्थ आयडीच्या नोंदींबाबत अनियमिततेच्या तक्रारी आणि चौकशी सुरू असतानाच सोलापूर जिल्ह्यातही विशेष तपासणी पथकाकडून शालार्थ आयडीसंदर्भातील कागदपत्रांची छाननी सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने रविवारी सुट्टीच्या दिवशी तातडीचे आदेश काढल्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

सन २०१६ ते २०१९ तसेच २०१९ ते २०२५ या कालावधीत देण्यात आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतेच्या मूळ प्रती तातडीने जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, संबंधित कागदपत्रे उद्या (सोमवारी) सकाळी नक वाजेपर्यंत सादर करण्याची मुदत देण्यात आल्याने शिक्षण विभागाच्या या घाईमागे नेमके कारण काय, असा सवाल शिक्षकांमधून उपस्थित होत आहे. हे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी विशाल मुळे तसेच महापालिका प्रशासनाधिकारी मल्हारी माने यांनी काढले आहेत. सुट्टीच्या दिवशीच कागदपत्रे मागविण्याची तातडी आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी नऊची अंतिम मुदत यामुळे संबंधित शिक्षक व कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ सुरू झाली आहे.

कागदपत्रांच्या छाननीचे गूढ कायम
वैयक्तिक मान्यता ही शिक्षक कर्मचाऱ्यांच्या संबंधित महत्त्वाची बाब असल्याने त्याच्या नोंदींची तपासणी गांभीर्याने केली जात आहे. मात्र, एवढ्या कमी कालावधीत मूळ कागदपत्रे मागविण्यामागील नेमकी चौकशी कोणत्या मुख्यांवर केंद्रित आहे. याबाबत अधिकृतपणे सविस्तर माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे ज्यांच्या नोंदींची चौकशी होत आहे, त्या नोंदींमध्ये नेमक्या कोणत्या बाबी तपासल्या जाणार आहेत ? तपासणीचा आवाका किती आहे? आणि या छाननीनंतर पुढील कारवाई काय होणार? याकडे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, अहवालातील नोंदींनुसार शालार्थ आयडी, कर्मचारी आणि संबंधित शाळांची माहिती संकलित करण्यात आली असून आता मूळ वैयक्तिक मान्यता मागविल्याने या तपासणीला अधिक गांभीर्य प्राप्त झाले आहे. शिक्षण विभागाच्याया तातडीच्या आदेशामुळे शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मान्यता प्रकरणाच्या तपासणीत पुढे काय निष्पन्न होते, याकडे संपूर्ण शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

कागदपत्रे द्या; घाबरू नका
रविवारी सुट्टीच्या दिवशी पत्र काढून तातडीने कागदपत्रे सादर करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांच्यावतीने देण्यात आले आहेत. मात्र, मुख्याध्यापकांना आवश्यक कागदपत्रे संकलित करून सादर करण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात यावा. हा चौकशीचा एक भाग असल्याने यादीतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घाबरून जाऊ नये. मुख्याध्यापक व शिक्षकांनी आवश्यक कागदपत्रे सादर करून प्रशासनाला सहकार्य करावे,
माजी शिक्षक आमदार ; दत्तात्रय सावंत

Previous Post

अभियांत्रिकीची दृष्टी अन् उद्योजकतेची दूरदृष्टी; विकास कोळींचा प्रेरणादायी प्रवास!!

Next Post

कंटेनरखाली घुसली स्कॉर्पिओ; मोहोळच्या तरुणाचा दुर्दैवी अंत

Related Posts

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सोलापूर जिल्हा

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..
सोलापूर जिल्हा

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

October 22, 2026
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!
सोलापूर जिल्हा

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

October 22, 2026
ब्रेकिंग : शिक्षण विभागात मोठे फेरबदल; दोन उपसंचालकांच्या बदल्या!
सोलापूर जिल्हा

ब्रेकिंग : शिक्षण विभागात मोठे फेरबदल; दोन उपसंचालकांच्या बदल्या!

October 22, 2026
अखेर पदवीधर शिक्षक-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी उद्या विशेष रजा मंजूर!
सोलापूर जिल्हा

अखेर पदवीधर शिक्षक-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी उद्या विशेष रजा मंजूर!

October 22, 2026
उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!
सोलापूर जिल्हा

उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!

October 22, 2026
Next Post
कंटेनरखाली घुसली स्कॉर्पिओ; मोहोळच्या तरुणाचा दुर्दैवी अंत

कंटेनरखाली घुसली स्कॉर्पिओ; मोहोळच्या तरुणाचा दुर्दैवी अंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

October 22, 2026
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

October 22, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In