Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

व्याजाच्या विळख्यात सोलापूर; बेकायदेशीर सावकारांची मुजोरी वाढली!

Solapur Mirror by Solapur Mirror
July 28, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
व्याजाच्या विळख्यात सोलापूर; बेकायदेशीर सावकारांची मुजोरी वाढली!

सोलापूर : जिल्ह्यात बेकायदेशीर सावकारीचे जाळे दिवसेंदिवस अधिक मजबूत होत असून, प्रशासनाच्या कारवाईच्या दाव्यांनंतरही सावकारांचा धाक कायम असल्याचे चित्र आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकरी, कष्टकरी, लघुउद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांना आजही खासगी सावकारांच्या दारात जावे लागत असून, अवाजवी व्याजदर, मानसिक छळ आणि बेकायदेशीर वसुलीमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. राज्य शासनाने २०२४ मध्ये सावकारी प्रतिबंधक कायद्याची अधिक प्रभावी अंमलबजावणी सुरू केली असली, तरी प्रत्यक्षात जिल्ह्यात परवानाधारक सावकारांच्या आड अनेक बेकायदेशीर व्यवहार सुरू असल्याचा आरोप होत आहे. सरकारी यंत्रणांचा ‘वचक सेल’ अस्तित्वात असला तरी तो प्रभावी ठरत नसल्याने सावकारांचा धाक वाढत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.

पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले आहे की, परवान्याशिवाय सावकारी करणे, अवाजवी व्याज आकारणे किंवा धमकी देऊन वसुली करणे हा गंभीर गुन्हा आहे. अशा प्रकारांचा बळी ठरलेल्या नागरिकांनी तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी. तक्रारदाराची गोपनीयता राखून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, जिल्हा उपनिबंधक मधुकर पवार यांनीही सावकारी प्रतिबंधक कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याचा इशारा दिला आहे. प्रत्येक कर्ज व्यवहाराची कायदेशीर नोंद, पावती आणि नियमांचे पालन बंधनकारक असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सावकारांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असे त्यांनी सांगितले. तथापि, प्रत्यक्षात अनेक नागरिक भीतीपोटी तक्रार करण्यास धजावत नसल्याने बेकायदेशीर सावकारीचे प्रमाण कमी होत नसल्याची खंत व्यक्त होत आहे. प्रशासनाने केवळ जनजागृती न करता नियमित धाडी, विशेष तपास मोहीम आणि तक्रारींवर तातडीने कारवाई केली, तरच सावकारांच्या दहशतीला आळा बसेल, अशी मागणी नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांकडून होत आहे.

बेकायदेशीर व विनापरवाना सावकारीला आळा घालण्यासाठी आणि कर्जदारांच्या संरक्षणासाठी राज्य शासनाने ‘महाराष्ट्र सावकारी अधिनियम, २०१४’ हा कायदा लागू केला आहे. गरजेपोटी व्याजाने पैसे घेतले असतील आणि मुद्दल देऊनही, संबंधित सावकार पैसे उकळण्यासाठी दमबाजी किंवा दादागिरी करत असेल, तर त्या लोकांनी पोलिसात तक्रार दाखल करावी, आमच्याकडून तक्रारदाराला संरक्षण दिले जाईल. अवैध पद्धतीने सावकारी करणाऱ्यांचा शोध घेण्याचे काम पोलीस करीत आहेत. एम. राजकुमार, पोलीस आयुक्त

परवान्याशिवाय पैसे देणे किंवा व्याज वसुली करणे हा पूर्णपणे गुन्हा आहे. शासनाने तारण आणि विनातारण कर्जासाठी व्याजदराची मर्यादा ठरवून दिलेली आहे. ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त किंवा चक्रवाढ व्याज आकारता येत नाही. परवानाधारक सावकाराने प्रत्येक कर्जदाराला दिलेल्या कर्जाची आणि परतफेडीची नोंद ठेवणे आणि प्रत्येक व्यवहाराची पावती देणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. यानुसार, बेकायदेशीररित्या सावकारी करणाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल.
मुकुंद पवार, जिल्हा उपनिबंधक, सोलापूर.

जिल्ह्यातील परवानाधारक सावकारांची आकडेवारी (२०२४–२०२६)
1) नवीन परवाने : २४१
2) परवाना नूतनीकरण : १,००७
3) एकूण परवानाधारक सावकार : १,२४८

तालुकानिहाय एकूण परवानाधारक सावकार :

सोलापूर शहर – ५०५

दक्षिण सोलापूर – ६१

उत्तर सोलापूर – २१

अक्कलकोट – १२८

बार्शी – १०९

मोहोळ – ४३

पंढरपूर – ७८

मंगळवेढा – २७

सांगोला – ४३

माढा – १०१

करमाळा – ३९

अक्कलकोट ग्रामीण – ९३

Previous Post

शिक्षण विभागाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात; एसआयटी लागण्याची शक्यता..

Next Post

अक्कलकोट भक्तिरंगात न्हाले; गुरुपौर्णिमेच्या भव्य पालखी सोहळ्याकडे लाखो भाविकांचे लक्ष!

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
अक्कलकोट भक्तिरंगात न्हाले; गुरुपौर्णिमेच्या भव्य पालखी सोहळ्याकडे लाखो भाविकांचे लक्ष!

अक्कलकोट भक्तिरंगात न्हाले; गुरुपौर्णिमेच्या भव्य पालखी सोहळ्याकडे लाखो भाविकांचे लक्ष!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In