Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

शिक्षण विभागाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात; एसआयटी लागण्याची शक्यता..

Solapur Mirror by Solapur Mirror
July 28, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
शिक्षण विभागाचा  कारभार संशयाच्या भोवऱ्यात; एसआयटी लागण्याची शक्यता..

सोलापूर : पवित्र पोर्टलवरील खासगी अनुदानित अल्पसंख्याक व बिगर अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षक भरतीच्या जाहिराती अचानक रद्द करण्याच्या निर्णयामुळे प्राथमिक शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भरती प्रक्रिया सुरू असताना कोणतेही स्पष्ट कारण किंवा पर्यायी व्यवस्था न देता जाहिराती मागे घेण्यात आल्याने हजारो पात्र आणि बेरोजगार उमेदवारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. हा निर्णय प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा नमुना असल्याची टीका शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे.

भरती प्रक्रिया पारदर्शक, गुणवत्ताधारित आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने पवित्र पोर्टलची अंमलबजावणी केली होती. मात्र, अतिरिक्त शिक्षक समायोजनाच्या कारणावरून भरतीला स्थगिती देत जाहिराती रद्द करण्यात आल्याने संपूर्ण प्रक्रियेवरच प्रश्न उपस्थित झाले आहेत. अनेक संस्थांनी अतिरिक्त शिक्षक स्वीकारले नसतानाही सर्व उमेदवारांना एकाच निकषावर अन्यायकारक निर्णयाचा फटका बसल्याचा आरोप केला जात आहे.यामुळे हजारो युवकांचे करिअर अनिश्चिततेत सापडले असून, अनेकांनी अर्ज, कागदपत्रे, पडताळणी आणि इतर प्रक्रियेसाठी केलेला खर्चही वाया गेला आहे. दुसरीकडे, रिक्त पदे न भरल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होणार असून, गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा हक्कही धोक्यात आल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.शिक्षक सेनेने प्राथमिक शिक्षणाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

भरती प्रक्रियेत झालेल्या विलंबाला आणि जाहिराती रद्द करण्याच्या निर्णयाला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर तातडीने शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.संघटनेच्या म्हणण्यानुसार, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पात्र उमेदवार आणि विद्यार्थी दोघांनाही फटका बसत आहे. निर्णयातील पारदर्शकता, जबाबदारी आणि उत्तरदायित्वाचा अभाव स्पष्टपणे दिसून येत असून, शासनाने तातडीने हस्तक्षेप करून भरती प्रक्रिया पूर्ववत सुरू करावी. अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिक्षक संघटनांनी दिला आहे.अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करणे आवश्यक आहे.

अतिरिक्त शिक्षकांना अनेक संस्थांनी हजर करून घेतले नाही, अशा संस्थांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ज्या शाळांनी अतिरिक्त शिक्षकांना हजर करून घेतले नाही, त्यांचे प्रस्ताव मंजूर करू नयेत, असे शासनाचेच आदेश आहेत. त्याठिकाणी असलेले शिक्षकाचे पद शासनाच्या नियमानुसार व्यापगत करण्याची कार्यवाही सुरू आहे. कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी

Tags: उपसंचालकएसआयटीकादर शेखपुणेप्राथमिकशिक्षण विभागशिक्षणाधिकारीसंचालक
Previous Post

आषाढी वारीत ज्येष्ठ-अपंग वारकऱ्यांना ‘मुखदर्शन’ची सुविधा; पंढरपुरात दोन पादचारी पूल उभारणार

Next Post

व्याजाच्या विळख्यात सोलापूर; बेकायदेशीर सावकारांची मुजोरी वाढली!

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
व्याजाच्या विळख्यात सोलापूर; बेकायदेशीर सावकारांची मुजोरी वाढली!

व्याजाच्या विळख्यात सोलापूर; बेकायदेशीर सावकारांची मुजोरी वाढली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In