Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापूर लोहमार्ग पोलिसांचा विक्रमः आंतरराज्यीय दागिने चोराला 3 तासांत ठोकल्या बेड्या..

Solapur Mirror by Solapur Mirror
June 29, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सोलापूर लोहमार्ग पोलिसांचा विक्रमः आंतरराज्यीय दागिने चोराला 3 तासांत ठोकल्या बेड्या..
0
SHARES
62
VIEWS

सोलापूर :बिकानेर एक्सप्रेसमध्ये प्रवासी महिलेचे तब्बल 9 लाख रुपयांचे दागिने लंपास करून फरार झालेल्या झारखंडच्या आंतरराज्यीय सराईत चोरट्याला सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी अवघ्या 3 तासांत अटक करून मोठी कामगिरी बजावली आहे. आधुनिक तंत्रज्ञानासोबतच पारंपरिक पोलिसी कौशल्याचा वापर करत पोलिसांनी ही कारवाई केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सुनावली राजनकुमार श्री सिद्धेश्वर कुमार श्रीवास्तव, वय 57 वर्षे, रा. रांची, झारखंड असे आहे. त्याच्यावर यापूर्वीही अनेक राज्यांमध्ये चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बिकानेर रेल्वेगाडीत प्रवास करणाऱ्या एका महिलेचे 9 लाख रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले होते. गुन्हा घडताच लोहमार्ग पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपीच्या मोबाइल लोकेशनच्या आधारे अवघ्या तीन तासांत त्याचा माग काढण्यात आला. चोरी केल्यानंतर आरोपी पहाटेच गाणगापूरला देवदर्शनासाठी गेला होता. त्यानंतर तो पुन्हा सोलापुरात आला. येथून राजकोट एक्सप्रेसने मुंबईला पळून जाण्याच्या तयारीत तो होता. पोलिस तपासात समोर आले की, आरोपी 21 तारखेला सोलापुरात आला होता. तो एका लॉजमध्ये खोटे नाव सांगून राहिला होता. मात्र, लॉजच्या नोंदवहीत दिलेला मोबाइल क्रमांक खरा होता. याच क्रमांकाच्या लोकेशनवरून पोलिसांनी त्याचा माग काढला.

गांधी चौकात सिनेस्टाइल पाठलाग, अटक करून आरोपींना ताकद घेण्यात आले आहे लोहमार्ग पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महेश भावीकट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शब्बीर तांबोळी, हवालदार प्रकाश जिराळ, सूरज वायदंडें , कोळी आणि संदीप राठोड यांच्या गुन्हे शोध पथकाने आरपीएफच्या मदतीने सोलापूर रेल्वे स्टेशनजवळील गांधी चौकात सापळा रचला. आरोपी येताच पोलिसांनी झडप घालून त्याला ताब्यात घेतले.

आरोपीकडून 4 सोन्याच्या बांगड्या, लेडीज पर्स आणि मोबाइल चार्जर असा एकूण 9 लाख 5 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे. केवळ 3 तासांत आंतरराज्यीय गुन्हेगाराला जेरबंद केल्याने सोलापूर लोहमार्ग पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सीसीटीव्ही, मोबाइल ट्रॅकिंग आणि मानवी बुद्धिमत्तेचा सुरेख समन्वय या कारवाईत दिसून आला.

Previous Post

दहावी-बारावीच्या परीक्षा सुधारणेसाठी राज्य समितीवर तानाजी माने यांची निवड

Next Post

करमाळा आयटीआयला ‘मदनदास देवी’ यांचे नाव ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑनलाइन करणार मार्गदर्शन

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
करमाळा आयटीआयला ‘मदनदास देवी’ यांचे नाव ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑनलाइन करणार मार्गदर्शन

करमाळा आयटीआयला ‘मदनदास देवी’ यांचे नाव ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑनलाइन करणार मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025