Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापुरातील सराईत गुंड प्रदीप गायकवाड एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध

Solapur Mirror by Solapur Mirror
May 23, 2026
in Uncategorized
0
सोलापुरातील सराईत गुंड प्रदीप गायकवाड एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध
0
SHARES
14
VIEWS

पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांची ५६ वी मोठी कारवाई; येरवडा कारागृहात रवानगी

सोलापूर; सोलापूर शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणारा सराईत गुंड प्रदीप मौला गायकवाड (वय ३३, रा. सेटलमेंट फ्री कॉलनी नं. ६, सलगर वस्ती, सोलापूर) याच्यावर सोलापूर शहर पोलिसांनी एमपीडीए कायद्यान्वये कठोर कारवाई करत त्यास स्थानबद्ध केले आहे. त्याची येरवडा कारागृह, पुणे येथे रवानगी करण्यात आली आहे.

  • प्रदीप गायकवाड हा सदर बझार, सलगर वस्ती, विजापूर नाका आणि फौजदार चावडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत साथीदारांच्या मदतीने अवैध आर्थिक फायद्यासाठी गंभीर गुन्हे करत असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. सेटलमेंट फ्री कॉलनी नं. ६, भैरू वस्ती, थोबडे मळा, लिमयेवाडी, लक्ष्मी नगर, साईबाबा चौक, स्टेशन रोड, डोणगाव रोड, बाळे, वांगी रोड, विजापूर रोड, कावळे गल्ली, सोरेगाव आणि जुना विजापूर नाका परिसरात त्याने दहशत निर्माण केली होती. त्याच्याविरुद्ध सोलापूर शहरात एकूण १२ गंभीर गुन्हे दाखल असून, त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले होते. व्यापारी आणि सामान्य नागरिकांमध्ये त्याची भीती निर्माण झाल्याने अनेकजण उघडपणे पोलिसांना माहिती देण्यास धजावत नसल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे.
  • प्रदीप गायकवाड यास गुन्हेगारी कृत्यांपासून परावृत्त करण्यासाठी यापूर्वी विविध प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या होत्या. सन २०१२ मध्ये फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ११० अन्वये, तसेच २०१४ आणि २०२४ मध्ये कलम १०७ अन्वये कारवाई करण्यात आली होती. याशिवाय २०१६ व २०२४ मध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ५६(१)(अ)(ब) अंतर्गतही कारवाई झाली होती. मात्र, त्याच्या वर्तनात कोणताही बदल न झाल्याने अखेर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेचा निर्णय घेण्यात आला. पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी २१ मे २०२६ रोजी एमपीडीए अधिनियम १९८१ च्या कलम ३ अंतर्गत स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित केले. त्यानुसार प्रदीप गायकवाड यास ताब्यात घेऊन येरवडा कारागृहात दाखल करण्यात आले.
  • ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील, विजय कबाडे, प्रितम यावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, दिलीप पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, वपोनि नामदेव बंडगर तसेच एमपीडीए पथकातील अधिकाऱ्यांनी केली. दरम्यान, शहरातील सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अवैध व्यवसाय करणारे, सराईत गुंड आणि समाजविघातक प्रवृत्तीच्या व्यक्तींवर यापुढेही एमपीडीए अंतर्गत कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Previous Post

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सोलापूर पोलिस सज्ज; ६ विशेष पथकं तैनात, २४ तास नाकाबंदी!

Next Post

धक्कादायक ! काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे यांचे निधन

Related Posts

आमदार निधीचा विकास ‘ऑन ग्राऊंड’;  नगरसेवक दीपक जमादार यांच्या कामाची पोच पावती..!
Uncategorized

आमदार निधीचा विकास ‘ऑन ग्राऊंड’; नगरसेवक दीपक जमादार यांच्या कामाची पोच पावती..!

August 6, 2026
सोलापूरच्या टॉवेल-चादरींना मिळणार ‘सरकारी’ आधार!
Uncategorized

सोलापूरच्या टॉवेल-चादरींना मिळणार ‘सरकारी’ आधार!

July 28, 2026
आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज!
Uncategorized

आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज!

July 19, 2026
सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात
Uncategorized

सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात

July 11, 2026
शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा
Uncategorized

शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा

June 24, 2026
‘एकही मत वाया नको’ : राजाभाऊंच्या विजयासाठी शिंदेंचे दूत सोलापुरात सक्रिय
Uncategorized

‘एकही मत वाया नको’ : राजाभाऊंच्या विजयासाठी शिंदेंचे दूत सोलापुरात सक्रिय

June 18, 2026
Next Post
धक्कादायक ! काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे यांचे निधन

धक्कादायक ! काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In