सोलापूर : जिल्हा सरकारी वकीलपदी नियुक्ती झाल्याबद्दल अॅड. आनंद कुर्डूकर व अतिरिक्त सरकारी अभियोक्तापदी अॅड. आनंद नरखेडकर सोलापूर येथे रुजू झाल्याबद्दल त्यांचा बार असोसिएशनच्यावतीने महाराष्ट्र शासनाचे विशेष सरकारी वकील पद्मश्री खासदार उज्ज्वल निकम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एस. कटारिया, बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. संतोष पाटील, उपाध्यक्ष अॅड. शर्मिला देशमुख, अॅड. परमानंद जवळकोटे, सचिव अॅड. जयप्रकाश भंडारे, सहसचिवा अॅड. प्रियंका गोरंटी, खजिनदार अॅड. सिद्धाराम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी बारचे अध्यक्ष अॅड. पाटील यांनी प्रास्ताविक करून अॅड. कुईकर यांच्या कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या. यावेळी खासदार निकम यांनीदेखील कुडूकर व नरखेडकर यांच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी अॅड. अमोगसिद्ध साखरे, अॅड. एन. के. शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना अॅड. कुर्डूकर यांनी पीडित लोकांना न्याय मिळवून देण्यास आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले.