Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

शिक्षकांच्या मागण्यांसाठी मंगेश चिवटेंचा दिल्लीत पाठपुरावा..

Solapur Mirror by Solapur Mirror
August 7, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
शिक्षकांच्या मागण्यांसाठी मंगेश चिवटेंचा दिल्लीत पाठपुरावा..

दिल्ली, दि. ७ : आझाद मैदानावरील शिक्षक आंदोलनादरम्यान राज्य शासनाने दिलेल्या आश्वासनांची लवकर अंमलबजावणी व्हावी, यासाठी पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार मंगेश चिवटे यांनी दिल्लीत प्रशासकीय स्तरावर महत्त्वपूर्ण पाठपुरावा केला. महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांची भेट घेऊन त्यांनी शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर केले.

आझाद मैदानावरील आंदोलनानंतर शिक्षक प्रतिनिधींशी चर्चा करून शासनाने त्यांच्या मागण्यांवर स्वतंत्र बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार संबंधित बैठक लवकर आयोजित करून निर्णय प्रक्रियेला गती मिळावी, यासाठी चिवटे यांनी उपसभापतींकडे पाठपुरावा केला.या निवेदनाची दखल घेत उपसभापती सचिन अहिर यांनी शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या दालनात संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित करण्याबाबत सकारात्मक नोंद केली आहे. त्यामुळे शिक्षकांच्या मागण्यांवर शासन स्तरावर लवकरच चर्चा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.शिक्षकांच्या प्रश्नांकडे केवळ आंदोलनाच्या दृष्टीने न पाहता त्यांच्या न्याय्य मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी शासन आणि शिक्षक संघटनांमध्ये समन्वय होणे आवश्यक असल्याचे मंगेश चिवटे यांनी यावेळी सांगितले.

शासनाने दिलेले आश्वासन प्रत्यक्षात पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.आझाद मैदानातील आंदोलनावेळी शिक्षकांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना चिवटे म्हणाले, “राज्यातील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक निर्णय व्हावा आणि त्यांना वेळेत न्याय मिळावा, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील.”दरम्यान, शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या दालनात प्रस्तावित बैठकीकडे राज्यभरातील शिक्षकांचे लक्ष लागले असून, या बैठकीत प्रलंबित मागण्यांबाबत ठोस निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous Post

अखेर न्याय मिळाला! जुनी मिल कामगार वारसदारांच्या नावे ३० कोटींची जागा

Next Post

माजी नगरसेविका ; राजश्री चव्हाण यांच्यावर भाजपची पुन्हा जबाबदारी..

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
माजी नगरसेविका ; राजश्री चव्हाण यांच्यावर भाजपची पुन्हा जबाबदारी..

माजी नगरसेविका ; राजश्री चव्हाण यांच्यावर भाजपची पुन्हा जबाबदारी..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In