Saturday, October 24, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सिद्धेश्वर मंदिराजवळ चार लाखांची चोरी; तमिळनाडूतील सात जणांना बेड्या!

Solapur Mirror by Solapur Mirror
August 13, 2026
in सोलापूर शहर, क्राईम, सोलापूर जिल्हा
0
सिद्धेश्वर मंदिराजवळ चार लाखांची चोरी; तमिळनाडूतील सात जणांना बेड्या!
0
SHARES
24
VIEWS

सोलापूर : सिद्धेश्वर मंदिर परिसरात उपचारासाठी आलेल्या भाविकाच्या कारच्या काचा फोडून तब्बल चार लाख रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा फौजदार चावडी पोलिसांच्या डी.बी. पथकाने पर्दाफाश केला. तमिळनाडूतील सात सराईत आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या चौकशीत सोलापूरसह महाराष्ट्र व तेलंगणातील कारफोडीच्या सात गुन्ह्यांची उकल झाली आहे.

शहरात कारच्या काचा फोडून चोरी तसेच घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने या गुन्ह्यांचा समांतर तपास सुरू केला होता. सिद्धेश्वर मंदिर परिसरातील चोरीच्या घटनेचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तसेच खबऱ्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून संशयितांचा माग काढला. टोळीतील संशयित आळंदी आणि मिरज परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे धाडी टाकल्या. दरम्यान, आरोपी पुन्हा सोलापूर शहरात चोरीच्या उद्देशाने आल्याची माहिती मिळाल्यानंतर पंचकट्टा ते होम मैदान परिसरात पोलिसांनी सापळा रचला. या कारवाईत सात जणांना ताब्यात घेण्यात आले.

ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून पोलिसांनी तीन लाख रुपयांची रोकड, लॅपटॉप बॅग आणि कागदपत्रे हस्तगत केली आहेत. आरोपी केवळ तमिळ भाषा बोलत असल्याने दुभाषिकाच्या मदतीने त्यांची चौकशी करण्यात आली. न्यायालयाने आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई सपोनि महादेव राऊत, सपोनि संजय क्षीरसागर आणि डी.बी. पथकातील कर्मचाऱ्यांनी केली.

तमिळनाडूतील सात आरोपी ताब्यात
ताब्यात घेण्यात आलेले सर्व आरोपी तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली आणि दिंडीगुल जिल्ह्यातील आहेत. षण्मुगम अमरनाथन, आदितन थंडयुथपाणी, सेरन मुकुंधन, आनंद विश्वनाथन, जगन बालसुब्रम्हण्यम, मनोजकुमार अनबलगन आणि कमलकन्नन गणेशन अशी त्यांची नावे आहेत. हे आरोपी मजुरीच्या बहाण्याने विविध भागांत फिरत आणि कारची पाहणी करून संधी साधून काचा फोडून चोरी करत असल्याचे तपासात समोर आले.

महाराष्ट्रासह तेलंगणातील सात गुन्हे उघड
पोलिसांच्या तपासात या टोळीने सोलापूर शहरात दोन, भाईंदर-काशीमीरा येथे एक, तुळजापूर येथे एक, दिघी (पिंपरी-चिंचवड) येथे एक, तर हैदराबादमधील महाकाली आणि पंजागुट्टा येथे प्रत्येकी एक असे एकूण सात कारफोडीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्व गुन्ह्यांबाबत पुढील तपास सुरू आहे.

Previous Post

कामाच्या बहाण्याने रेकी; द प्लॅटिनोमधील वायर चोरीचा पर्दाफाश चौघे जेरबंद

Next Post

रिक्षेतच साधला डाव; सोन्याचे दागिने लंपास करणारी टोळी जेरबंद

Related Posts

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सोलापूर जिल्हा

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..
सोलापूर जिल्हा

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

October 22, 2026
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!
सोलापूर जिल्हा

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

October 22, 2026
ब्रेकिंग : शिक्षण विभागात मोठे फेरबदल; दोन उपसंचालकांच्या बदल्या!
सोलापूर जिल्हा

ब्रेकिंग : शिक्षण विभागात मोठे फेरबदल; दोन उपसंचालकांच्या बदल्या!

October 22, 2026
अखेर पदवीधर शिक्षक-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी उद्या विशेष रजा मंजूर!
सोलापूर जिल्हा

अखेर पदवीधर शिक्षक-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी उद्या विशेष रजा मंजूर!

October 22, 2026
उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!
सोलापूर जिल्हा

उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!

October 22, 2026
Next Post
रिक्षेतच साधला डाव; सोन्याचे दागिने लंपास करणारी टोळी जेरबंद

रिक्षेतच साधला डाव; सोन्याचे दागिने लंपास करणारी टोळी जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

October 22, 2026
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

October 22, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In