Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

महापालिकेच्या ₹३० कोटींच्या ठेवींवरून भाजपमध्ये दोन गट आमनेसामने; उपमहापौरांच्या भूमिकेला वेडिंग यांची उघड साथ

Solapur Mirror by Solapur Mirror
July 18, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
महापालिकेच्या ₹३० कोटींच्या ठेवींवरून भाजपमध्ये दोन गट आमनेसामने; उपमहापौरांच्या भूमिकेला वेडिंग यांची उघड साथ

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या सुमारे ३० कोटी रुपयांच्या मुदतठेवी कोणत्या बँकेत ठेवायच्या, या प्रशासकीय निर्णयावरून भाजपमध्ये निर्माण झालेला अंतर्गत वाद आता उघडपणे समोर आला आहे. शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या भूमिकेवर सार्वजनिक नाराजी व्यक्त केल्यानंतर आता भाजपचे ज्येष्ठ नेते वेडिंग यांनी उपमहापौरांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शविल्याने पक्षातील दोन गट स्पष्टपणे समोर आल्याचे चित्र आहे.

महापालिकेच्या निधीवर अधिक व्याज मिळावे आणि आर्थिक लाभ व्हावा या उद्देशाने स्थायी समितीने ठेवी खासगी बँकेत ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. मात्र, सार्वजनिक निधीची सुरक्षितता आणि राष्ट्रीयीकृत बँकेवरील विश्वास लक्षात घेऊन या ठेवी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्येच ठेवाव्यात, अशी मागणी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी थेट महापालिका आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली.या निर्णयावर शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी तीव्र आक्षेप घेत, महापौर, सभागृह नेते आणि पक्ष संघटनेला विश्वासात न घेता थेट आयुक्तांना पत्र देणे योग्य नसल्याचे स्पष्ट केले.

पक्षातील समन्वय राखला गेला नाही, असे सांगत त्यांनी या प्रकरणाची माहिती पक्षश्रेष्ठींना देणार असल्याचेही जाहीर केले.दरम्यान, या वादात भाजपचे ज्येष्ठ नेते वेडिंग यांनी उपमहापौरांच्या भूमिकेचे समर्थन केले. महापालिकेचा निधी हा जनतेचा पैसा असून त्याच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे उपमहापौरांनी मांडलेला मुद्दा चुकीचा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या घडामोडींमुळे महापालिकेतील आर्थिक निर्णयापेक्षा भाजपमधील अंतर्गत समन्वय आणि नेतृत्वाच्या भूमिकेचीच अधिक चर्चा सुरू झाली आहे. महापालिकेच्या आर्थिक व्यवहारांवरून पक्षातील मतभेद उघडकीस आल्याने आगामी महासभा आणि स्थायी समितीच्या बैठकीत हा विषय आणखी तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आता या वादावर पक्ष नेतृत्व काय भूमिका घेते आणि महापालिकेच्या ठेवींबाबत अंतिम निर्णय कोणता होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Previous Post

आषाढी वारीसाठी भीमा नदीत उद्या १६०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

Next Post

माढा तालुक्यात संत एकनाथ महाराज पालखीचे जल्लोषात स्वागत

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
माढा तालुक्यात संत एकनाथ महाराज पालखीचे जल्लोषात स्वागत

माढा तालुक्यात संत एकनाथ महाराज पालखीचे जल्लोषात स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In