Sunday, October 25, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

पंढरपुरात युवकाची निर्घृण हत्या; मृतदेह रेल्वे रुळावर, पाय तोडून मावशीच्या घरावर टांगल्याचा आरोप

Solapur Mirror by Solapur Mirror
June 16, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
पंढरपुरात युवकाची निर्घृण हत्या; मृतदेह रेल्वे रुळावर, पाय तोडून मावशीच्या घरावर टांगल्याचा आरोप
0
SHARES
32
VIEWS

पंढरपूर, : पंढरपूर शहरातील अनिलनगर परिसरात राहणाऱ्या २५ वर्षीय युवकाचा खून करून त्याचा मृतदेह भीमा नदीलगतच्या रेल्वे रुळांवर टाकल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे. रोहित मधुकर कोरे (वय २५) असे मृत युवकाचे नाव आहे. मंगळवारी सकाळी भीमा नदीजवळील रेल्वे रुळांवर हात-पाय बांधलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठविण्यात आला असून प्राथमिक तपास सुरू आहे.

दरम्यान, रोहितच्या आईने या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. आपल्या मुलाचा पूर्वनियोजित कट रचून खून करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच, हा प्रकार अपघात किंवा आत्महत्या असल्याचा बनाव निर्माण करण्यासाठी मृतदेह रेल्वे रुळांवर टाकण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. याशिवाय, मृताचा एक पाय तोडून तो आपल्या बहिणीच्या घरावर टांगण्यात आल्याचा धक्कादायक आरोपही त्यांनी केला आहे. या प्रकरणात शेजारी राहणाऱ्या काही व्यक्तींवर संशय व्यक्त करत संबंधितांची नावे पोलिसांना दिल्याची माहिती त्यांनी दिली.

पोलिसांकडून सर्व आरोपांची पडताळणी केली जात असून घटनास्थळावरील पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि संबंधित व्यक्तींची चौकशी करण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवाल आणि तपासानंतरच मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Previous Post

रक्ताच्या प्रत्येक थेंबातून वाचते जीवन; सोलापुरात जनजागृती मोहीम

Next Post

विधान परिषदेच्या रणधुमाळीत उद्या मतदान; प्रशासनाची जय्यत तयारी

Related Posts

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सोलापूर जिल्हा

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..
सोलापूर जिल्हा

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

October 22, 2026
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!
सोलापूर जिल्हा

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

October 22, 2026
ब्रेकिंग : शिक्षण विभागात मोठे फेरबदल; दोन उपसंचालकांच्या बदल्या!
सोलापूर जिल्हा

ब्रेकिंग : शिक्षण विभागात मोठे फेरबदल; दोन उपसंचालकांच्या बदल्या!

October 22, 2026
अखेर पदवीधर शिक्षक-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी उद्या विशेष रजा मंजूर!
सोलापूर जिल्हा

अखेर पदवीधर शिक्षक-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी उद्या विशेष रजा मंजूर!

October 22, 2026
उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!
सोलापूर जिल्हा

उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!

October 22, 2026
Next Post
विधान परिषदेच्या रणधुमाळीत उद्या मतदान; प्रशासनाची जय्यत तयारी

विधान परिषदेच्या रणधुमाळीत उद्या मतदान; प्रशासनाची जय्यत तयारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

October 22, 2026
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

October 22, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In