Saturday, October 24, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

निर्माल्यातून फुलणार वृक्ष; १८०० ‘श्री सदस्यां’चा पर्यावरण जागर

Solapur Mirror by Solapur Mirror
September 26, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
निर्माल्यातून फुलणार वृक्ष; १८०० ‘श्री सदस्यां’चा पर्यावरण जागर

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; hdrForward: 0; highlight: false; sv:16.1.14.4.W30; module: photo;hw-remosaic: false;touch: (0.04027778, 0.18899307);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: auto;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 44;

0
SHARES
3
VIEWS

गणेश विसर्जनात अहोरात्र सेवा; संकलित निर्माल्यापासून सेंद्रिय खत, शेतकऱ्यांनाही होणार वाटप

सोलापूर, . गणरायाला निरोप देताना जमा होणारे निर्माल्य थेट कचऱ्यात किंवा जलस्रोतांमध्ये जाण्याऐवजी त्याचे ‘हरित सोन्या’त रूपांतर करण्याचा पर्यावरणपूरक उपक्रम डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान (रेवदंडा, ता. अलिबाग, जि. रायगड) आणि सोलापुरातील श्री सदस्यांनी हाती घेतला. शुक्रवारी झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीपासून शनिवारी पहाटेपर्यंत तब्बल १८०० श्री सदस्यांनी शहरातील विविध विसर्जन स्थळांवर अहोरात्र सेवा बजावत निर्माल्य संकलन केले. विशेष म्हणजे या निर्माल्यापासून सेंद्रिय कंपोस्ट खत तयार करून वृक्षांसह स्थानिक शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळपासूनच प्रतिष्ठानचे श्री सदस्य शहरातील प्रमुख विसर्जन स्थळांवर तैनात झाले होते. तळे हिप्परगा, विडी घरकुल, सागर चौक, गणपती घाट, विष्णू घाट, कंबर तलावातील तीन गेटसह शहरातील विविध लहान-मोठ्या विसर्जन स्थळांवर श्री सदस्यांनी नागरिकांकडून निर्माल्य स्वीकारून त्याचे संकलन केले. विसर्जन मिरवणुका सुरू असेपर्यंत ही सेवा अखंडपणे सुरू होती.

मिरवणूक मार्ग आणि विसर्जन स्थळांवर जमा झालेली फुले, हार, निर्माल्य तसेच अन्य कचरा स्वतंत्रपणे संकलित करण्यात आला. त्यानंतर संकलित कचऱ्याचे वर्गीकरण करून प्लास्टिक व अन्य अजैविक कचरा सोलापूर महानगरपालिकेच्या घंटागाड्यांकडे सुपूर्द करण्यात आला. जलप्रदूषण टाळण्यासाठी विसर्जन न करता अर्पण करण्यात आलेल्या गणेशमूर्तीही श्री सदस्यांनी सन्मानपूर्वक संकलित केल्या.शेकडो श्री सदस्यांनी कोणताही गाजावाजा न करता तासन्‌तास विसर्जन स्थळांवर थांबून केलेल्या या सेवेमुळे परिसर स्वच्छ ठेवण्याबरोबरच जलप्रदूषण रोखण्यास हातभार लागला. ‘निर्माल्य कचरा नाही, पर्यावरणासाठी उपयुक्त संसाधन आहे,’ हा संदेश प्रतिष्ठानच्या या उपक्रमातून कृतीतून देण्यात आला. शिस्तबद्ध नियोजन, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाची सांगड घालणाऱ्या या उपक्रमाचे नागरिकांकडूनही कौतुक होत आहे.

निर्माल्याचे होणार ‘हरित सोनं’
गणेशोत्सवात संकलित झालेल्या निर्माल्याची विल्हेवाट न लावता त्याचा पुनर्वापर करण्यावर प्रतिष्ठानने भर दिला आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही संकलित फुले, हार व अन्य जैविक निर्माल्यापासून सेंद्रिय कंपोस्ट खत तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे एकीकडे जलस्रोतांमध्ये निर्माल्य जाण्यापासून रोखले जाणार असून, दुसरीकडे त्याच निर्माल्याचा पर्यावरण संवर्धनासाठी उपयोग होणार आहे.

रे नगर, दहिटणेतील वृक्षांना मिळणार खत
निर्माल्यापासून तयार झालेले सेंद्रिय खत रे नगर आणि दहिटणे परिसरात प्रतिष्ठानच्या माध्यमातून लावण्यात आलेल्या वृक्षांना घालण्यात येणार आहे. याशिवाय उर्वरित खत स्थानिक शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे श्री सदस्य ॲड. उमेश भोजने यांनी दिली. त्यामुळे गणेशोत्सवातील निर्माल्याचा शेती आणि वृक्षसंवर्धनासाठी उपयुक्त वापर होणार आहे.

Previous Post

साखर उद्योगासमोर दुहेरी संकट; ‘एमएसपी’ वाढवा बाळराजे पाटील

Next Post

२६५ तालुक्यांत दुष्काळ; पंचनामे होतील, अहवाल जाईल; शेतकऱ्यांना मदत कधी?

Related Posts

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सोलापूर जिल्हा

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..
सोलापूर जिल्हा

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

October 22, 2026
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!
सोलापूर जिल्हा

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

October 22, 2026
ब्रेकिंग : शिक्षण विभागात मोठे फेरबदल; दोन उपसंचालकांच्या बदल्या!
सोलापूर जिल्हा

ब्रेकिंग : शिक्षण विभागात मोठे फेरबदल; दोन उपसंचालकांच्या बदल्या!

October 22, 2026
अखेर पदवीधर शिक्षक-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी उद्या विशेष रजा मंजूर!
सोलापूर जिल्हा

अखेर पदवीधर शिक्षक-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी उद्या विशेष रजा मंजूर!

October 22, 2026
उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!
सोलापूर जिल्हा

उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!

October 22, 2026
Next Post
२६५ तालुक्यांत दुष्काळ; पंचनामे होतील, अहवाल जाईल; शेतकऱ्यांना मदत कधी?

२६५ तालुक्यांत दुष्काळ; पंचनामे होतील, अहवाल जाईल; शेतकऱ्यांना मदत कधी?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

October 22, 2026
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

October 22, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In