Saturday, October 24, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

साखर उद्योगासमोर दुहेरी संकट; ‘एमएसपी’ वाढवा बाळराजे पाटील

Solapur Mirror by Solapur Mirror
September 26, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
साखर उद्योगासमोर दुहेरी संकट; ‘एमएसपी’ वाढवा बाळराजे पाटील
0
SHARES
3
VIEWS

मोहोळ, दुष्काळी परिस्थितीमुळे उसाची अपेक्षित वाढ झालेली नसल्याने यंदाच्या गळीत हंगामात टनेज आणि साखर उताऱ्यात घट होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कारखान्यांसाठी आवश्यक केमिकलच्या दरातही दीडपटीने वाढ झाल्याने साखर उद्योगासमोर दुहेरी आर्थिक संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) पाच हजार रुपये प्रतिक्विंटल करावी, तर रिकव्हरीमध्ये सुमारे दोन टक्क्यांची संभाव्य घट लक्षात घेऊन राज्य शासनाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक हजार रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखान्याचे अध्यक्ष विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटील यांनी केली.

लक्ष्मीनगर येथील लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखान्याच्या बॉयलर विभागात गुरुवारी बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम झाला. यावेळी ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांशी संवाद साधताना पाटील यांनी आगामी गळीत हंगामातील अडचणींचा वेध घेतला. यंदाचा गळीत हंगाम अत्यंत अडचणीच्या आणि प्रतिकूल परिस्थितीत सुरू करावा लागत आहे. दुष्काळात शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने ऊस जगविला. मात्र पुरेशा पाण्याअभावी उसाची अपेक्षित वाढ झालेली नाही. परिणामी प्रतिएकरी टनेज घटण्याबरोबरच साखर उताऱ्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. याचा थेट आर्थिक फटका ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखाने या दोघांनाही बसू शकतो, असे पाटील यांनी सांगितले.

कारखान्यांच्या उत्पादन खर्चातही मोठी वाढ झाली आहे. विशेषतः गळीत प्रक्रियेसाठी लागणाऱ्या केमिकलच्या दरात जवळपास दीडपटीने वाढ झाली आहे. उत्पादन खर्च वाढत असताना साखरेच्या किमान विक्री किमतीत अपेक्षित वाढ झालेली नसल्याने कारखान्यांच्या आर्थिक गणितावर परिणाम होत आहे. त्यामुळे साखरेची एमएसपी पाच हजार रुपये करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमास सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील, कारखान्याचे अध्यक्ष बाळराजे पाटील, सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील, कार्यकारी संचालक ओमप्रकाश जोगदे, सभापती अस्लम चौधरी, नानासाहेब डोंगरे, संचालक प्रकाश चवरे, जि. प. सदस्य लखन शिंदे, बालाजी नरुटे, धनाजी गावडे, सतीश काळे, सतीश भोसले, हनमंत पोटरे, जालिंदर लांडे, दीपक माळी, रमेश माने, संजीव खिलारे, सुशील क्षीरसागर, राजकुमार पाटील, सहदेव कापसे, नवनाथ मसलकर, बाळासाहेब भोसले, ज्योती विरपे, हेमंत गरड यांच्यासह ऊस उत्पादक सभासद, शेतकरी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रकाश चवरे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

‘जेवढा जास्त दर देता येईल, तेवढा देऊ’
ऊस उत्पादकांना योग्य मोबदला देण्याची कारखान्याची भूमिका स्पष्ट करताना बाळराजे पाटील म्हणाले, ‘आम्ही बोलतो तेच करतो, मोठे बोलत नाही. ऊसाला जेवढा जास्त दर देता येईल, तेवढा देण्याचा आमचा प्रयत्न राहील.’ प्रतिकूल परिस्थितीतही शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देऊन गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

बॉयलर अग्निप्रदीपनाने हंगामाची तयारी
प्रारंभी ऊस उत्पादक शेतकरी नागराज पाटील व त्यांच्या पत्नी कल्पना पाटील यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा आणि अग्निपूजा करण्यात आली. बाजीराव जोशी यांनी पौरोहित्य केले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते लोकनेते बाबुराव पाटील अनगरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार यशवंत माने होते. यावेळी माने यांच्यासह देवानंद गुंड, नानासाहेब डोंगरे आणि अस्लम चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले.

Previous Post

अन्न भेसळ अन् बनावट औषधांविरोधात ‘पंचमुखी’ गणेश उत्सव मंडळाचा जागर

Next Post

निर्माल्यातून फुलणार वृक्ष; १८०० ‘श्री सदस्यां’चा पर्यावरण जागर

Related Posts

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सोलापूर जिल्हा

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..
सोलापूर जिल्हा

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

October 22, 2026
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!
सोलापूर जिल्हा

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

October 22, 2026
ब्रेकिंग : शिक्षण विभागात मोठे फेरबदल; दोन उपसंचालकांच्या बदल्या!
सोलापूर जिल्हा

ब्रेकिंग : शिक्षण विभागात मोठे फेरबदल; दोन उपसंचालकांच्या बदल्या!

October 22, 2026
अखेर पदवीधर शिक्षक-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी उद्या विशेष रजा मंजूर!
सोलापूर जिल्हा

अखेर पदवीधर शिक्षक-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी उद्या विशेष रजा मंजूर!

October 22, 2026
उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!
सोलापूर जिल्हा

उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!

October 22, 2026
Next Post
निर्माल्यातून फुलणार वृक्ष; १८०० ‘श्री सदस्यां’चा पर्यावरण जागर

निर्माल्यातून फुलणार वृक्ष; १८०० ‘श्री सदस्यां’चा पर्यावरण जागर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

October 22, 2026
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

October 22, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In