गणेश कोळी यांचा सामाजिक उपक्रम; २२ ऑक्टोबर रोजी इंद्रधनुष इस्टेट येथे आयोजन
सोलापूर : महर्षी वाल्मिकी जयंतीचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत गणेश कोळी यांच्या वतीने सोलापुरात भव्य रक्तदान शिबिर आणि ५१ मूर्तींच्या वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, दि. २२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विजापूर रोडवरील इंद्रधनु इस्टेट, सेफुल चौक येथे हा सामाजिक उपक्रम पार पडणार आहे.
महर्षी वाल्मिकी जयंती केवळ उत्सवापुरती मर्यादित न ठेवता समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून साजरी करण्याचा प्रयत्न या आयोजनातून करण्यात आला आहे. रक्तदान हे श्रेष्ठ दान मानले जाते. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि रक्तदानाविषयी समाजात जनजागृती व्हावी, हा रक्तदान शिबिरामागील महत्त्वाचा उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत ५१ मूर्तींचे वाटपही करण्यात येणार आहे. ज्या मंडळांनी मूर्तींसाठी आपली नावे नोंदवली आहेत, त्या मंडळांनी निर्धारित ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.











