Saturday, October 24, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

दुष्काळात शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी १०० कीर्तनांचा जागर !

Solapur Mirror by Solapur Mirror
October 21, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
दुष्काळात शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी १०० कीर्तनांचा जागर !
0
SHARES
8
VIEWS

सोलापूर : दुष्काळाच्या भीषण संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मानसिक आधार देण्यासाठी आणि त्यांच्यात जगण्याची नवी उमेद निर्माण करण्यासाठी ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज यांनी अनोखा संकल्प केला आहे. विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर त्यांनी जिल्ह्यातील गावागावांत १०० कीर्तनांच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्यांविरोधात जनजागृती करण्याचा निर्धार व्यक्त केला. सोलापुरातील श्री संत मुक्ताई मंदिरात हा संकल्प करण्यात आला.

सध्या दुष्काळामुळे शेती, पशुधन आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह सांभाळताना शेतकऱ्यांची मोठी कसरत होत आहे. अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांनी मानसिकदृष्ट्या खचून न जाता संकटाचा धैर्याने सामना करावा, यासाठी कीर्तनातून प्रबोधन करण्याचा मानस इंगळे महाराजांनी व्यक्त केला. शेतकरी हा संपूर्ण समाजाचा अन्नदाता असून वारकरी संप्रदायाचा अविभाज्य घटक आहे. शेतकरी आणि वारकरी यांचे नाते अतूट असल्याने वारकरी संप्रदायानेही या संकटकाळात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेता गावागावांतील धार्मिक उत्सव, सप्ताह आणि इतर कार्यक्रम अनावश्यक खर्च टाळून साधेपणाने साजरे करावेत, असे आवाहन त्यांनी केले. पुढील पावसाळ्यापर्यंत उपलब्ध साधनसामग्रीचे योग्य नियोजन करून परिस्थितीला सामोरे जाणे आवश्यक आहे. आर्थिक संकट कितीही गंभीर असले तरी आत्महत्या हा त्यावरील उपाय नाही. प्रत्येक व्यक्तीचे जीवन त्यांच्या कुटुंबासाठी अनमोल असून संकटाच्या काळात मनोधैर्य टिकविणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

कीर्तनाच्या माध्यमातून केवळ धार्मिक विचार मांडण्याऐवजी शेतकऱ्यांच्या जीवनातील वास्तव, दुष्काळाचे परिणाम, कुटुंबाची जबाबदारी आणि संकटावर मात करण्यासाठी आवश्यक असलेले मानसिक बळ यावर विशेष भर देण्यात येणार आहे. या प्रबोधनातून शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक विचार आणि परस्पर सहकार्याची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. श्री संत मुक्ताई मंदिरात झालेल्या या संकल्पप्रसंगी तानाजी महाराज बेलेराव, शंकर भोसले, प्रभाकर ताटे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

संकट मोठे असले तरी जीवन त्याहून अनमोल!
दुष्काळामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक आणि मानसिक संकट उभे ठाकले आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत टोकाचे पाऊल उचलू नये. प्रत्येक शेतकरी आपल्या कुटुंबाचा आधारस्तंभ आहे. संकटाच्या काळात धैर्य, संयम आणि परस्पर सहकार्याची गरज आहे. कीर्तनातून शेतकऱ्यांचे मनोबल वाढविणे, त्यांना निराशेतून बाहेर काढणे आणि जगण्याची नवी उमेद देणे, हाच १०० कीर्तनांच्या संकल्पामागील मुख्य उद्देश असल्याचे ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज यांनी स्पष्ट केले.

Tags: जनजागृतीदुष्काळमानसिक संकटवारकरी संप्रदायश्री संत मुक्ताई मंदिरह.भ.प. सुधाकर इंगळे
Previous Post

दसऱ्याला फुलांचा शाही थाट; विठुरायाचा दरबार झाला रंगीबेरंगी!

Next Post

महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त उद्या सोलापुरात ५१ मूर्तींचे वाटप!

Related Posts

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सोलापूर जिल्हा

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..
सोलापूर जिल्हा

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

October 22, 2026
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!
सोलापूर जिल्हा

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

October 22, 2026
ब्रेकिंग : शिक्षण विभागात मोठे फेरबदल; दोन उपसंचालकांच्या बदल्या!
सोलापूर जिल्हा

ब्रेकिंग : शिक्षण विभागात मोठे फेरबदल; दोन उपसंचालकांच्या बदल्या!

October 22, 2026
अखेर पदवीधर शिक्षक-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी उद्या विशेष रजा मंजूर!
सोलापूर जिल्हा

अखेर पदवीधर शिक्षक-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी उद्या विशेष रजा मंजूर!

October 22, 2026
उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!
सोलापूर जिल्हा

उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!

October 22, 2026
Next Post
महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त उद्या सोलापुरात ५१ मूर्तींचे वाटप!

महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त उद्या सोलापुरात ५१ मूर्तींचे वाटप!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

October 22, 2026
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

October 22, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In