Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

अखेर प्रतीक्षा संपली ; प्रवासाचा वेळ वाचणार! सोलापूरसाठी पुण्याहून पहिल्यांदाच विमानसेवा; उन्हाळी हंगामात १५ नवीन स्लॉट मंजूर.

Solapur Mirror by Solapur Mirror
April 14, 2026
in Uncategorized
0
अखेर प्रतीक्षा संपली ; प्रवासाचा वेळ वाचणार! सोलापूरसाठी पुण्याहून पहिल्यांदाच विमानसेवा; उन्हाळी हंगामात १५ नवीन स्लॉट मंजूर.
0
SHARES
118
VIEWS

पुणे: पुण्याहून सोलापूरला आता अवघ्या ४० ते ४५ मिनिटांतच पोहोचणे शक्य होणार आहे. पुणे विमानतळावर सोलापूरसाठी सेवा देणाऱ्या स्टार एअर कंपनीला स्लॉट मंजूर झाले असून १ मेपासून ही विमानसेवा सुरू होणार आहे. पुण्याहून पहिल्यांदाच सोलापूरशी हवाई कनेक्टिव्हिटी होत असून या निमित्ताने पुण्याशी जोडलेले सोलापूर हे पश्चिम महाराष्ट्रातील पहिले शहर ठरले आहे. पुणे विमानतळाचा उन्हाळी हंगाम सुरू झाला असून १ मेपासून पुणे विमानतळाला मंजूर झालेले १५ स्लॉटचा वापर सुरू होत आहे. त्यामुळे पुणे शहराच्या प्रादेशिक आणि राष्ट्रीय कनेक्टिव्हिटीमध्ये मोठी वाढ होत आहे. १५ अतिरिक्त स्लॉटमुळे आता दररोजच्या एकूण स्लॉटची संख्या २२० वरून २३५ झाली आहे. नवीन स्लॉटमध्ये पुण्याहून सोलापूर, मंगळूरू व बागडोगरा या शहरांसाठी पुण्याहून पहिल्यांदाच विमानसेवा सुरू होत आहे.

‘कनेक्टिंग फ्लाइट’चा फायदा सोलापूरकरांना
सोलापूरहून विमान पुण्यात दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी दाखल होईल. थोड्या वेळाच्या अंतराने पुण्याहून दिल्ली, लखनौ, देहरादून, बंगळूरू, कोलकाता, चेन्नई, दुबईसाठी उड्डाणे होतात. त्यामुळे याचा फायदा सोलापूरकरांना देखील होणार आहे. ते ‘कनेक्टिंग फ्लाइट’द्वारे अन्य शहरांसाठी पुण्याहून सहजपणे प्रवास करू शकतील.

  • पुणे – सोलापूर – पुणे अशी आठवड्यातील सातही दिवस विमानसेवा असणार आहे. शनिवारी मात्र वेळेत बदल असणार आहे.
  • सोमवार ते शुक्रवार दरम्यान सोलापूरहून दुपारी अडीचच्या सुमारास उड्डाण होईल. पुण्यात दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी आगमन होईल.
  • पुण्याहून दुपारी ४ वाजता सोलापूरला उड्डाण होईल. ४ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास सोलापुरात आगमन होईल.
  • पुणे – सोलापूर – पुणे फ्लाइट क्रमांक (एस ५-३३१/३३२) असा असणार आहे.
  • शनिवारी सोलापूरहून ४ वाजून २० मिनिटांनी पुण्यात दाखल होईल, तर पुण्याहून सोलापूरसाठी ४ वाजून ४० मिनिटांनी उड्डाण होईल.
  • (सूचना : सोलापूरहून विमानाचे उड्डाण व सोलापुरात दाखल होण्याची वेळ अंदाजित आहे.)

Previous Post

खरात प्रकरणात सत्ताधारी मंत्री अन् नेत्यांची नावे? प्रणिती शिंदेंचा सरकारवर थेट निशाणा.

Next Post

गणेश नगर तांडा, कोंडी येथे घनश्याम भोसले प्रतिष्ठानतर्फे साड्या वाटप

Related Posts

आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज!
Uncategorized

आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज!

July 19, 2026
सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात
Uncategorized

सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात

July 11, 2026
शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा
Uncategorized

शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा

June 24, 2026
‘एकही मत वाया नको’ : राजाभाऊंच्या विजयासाठी शिंदेंचे दूत सोलापुरात सक्रिय
Uncategorized

‘एकही मत वाया नको’ : राजाभाऊंच्या विजयासाठी शिंदेंचे दूत सोलापुरात सक्रिय

June 18, 2026
मतदानात ‘उत्तर सोलापूर’ अव्वल तर ‘पंढरपूर’ संथ; पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ११.८५ टक्के मतदान
Uncategorized

मतदानात ‘उत्तर सोलापूर’ अव्वल तर ‘पंढरपूर’ संथ; पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ११.८५ टक्के मतदान

June 18, 2026
पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत
Uncategorized

पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत

June 15, 2026
Next Post
गणेश नगर तांडा, कोंडी येथे घनश्याम भोसले प्रतिष्ठानतर्फे साड्या वाटप

गणेश नगर तांडा, कोंडी येथे घनश्याम भोसले प्रतिष्ठानतर्फे साड्या वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025