No Result
View All Result
सोलापूर : मागास समाजसेवा मंडळ संचलित जय जवान जय किसान मुलांची सैनिकी शाळा व ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी शिखर पहारिया फाउंडेशनच्या वतीने तीन डिजिटल टीव्ही भेट देण्यात आले. या डिजिटल सुविधांचे उद्घाटन फाउंडेशनचे कार्यकर्ते राज सलगर, धर्मराज गुंडे, आसिफ चौधरी, तन्वीर शेख, तुषार जोगधनकर, कौशल शिंदे व फुरकान मनियार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. डिजिटल माध्यमांमुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक व्हिडिओ, चित्रे, नकाशे, ॲनिमेशन आणि विविध डिजिटल शैक्षणिक साहित्याचा वापर करून अभ्यास अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.
यावेळी राज सलगर यांनी विद्यार्थ्यांनी डिजिटल साधनांचा विधायक वापर करून मन लावून शिक्षण घ्यावे व जीवनात मोठे ध्येय साध्य करावे, असे आवाहन केले. धर्मराज गुंडे यांनी डिजिटल सुविधांचा अधिकाधिक शैक्षणिक वापर करून अध्ययन सोपे, रंजक आणि परिणामकारक करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा शाळेचे प्राचार्य रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. प्राचार्य रविंद्र चव्हाण, कमांडंट अशोक कुमार मंचंदा आणि संस्थेचे अध्यक्ष सुभाष चव्हाण यांनी शिखर पहारिया फाउंडेशनच्या शैक्षणिक योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनिता नेवसे यांनी केले, तर अर्चना नागणे यांनी आभार मानले.
No Result
View All Result