Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

आडसुळ-मंत्री भुसे यांच्या भेटीत शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर खल

Solapur Mirror by Solapur Mirror
August 11, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
आडसुळ-मंत्री भुसे यांच्या भेटीत शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर खल

सोलापूर , दि. ११ : राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची मंत्रालयात भेट घेतली. २००५ पूर्वी नियुक्त अंशतः अनुदानित शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, प्रलंबित टप्पा अनुदानाचा प्रश्न निकाली काढावा आणि शिक्षकांसाठी कॅशलेस आरोग्य योजना सुरू करावी, अशा प्रमुख मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले.

संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. बापूसाहेब आडसुळ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर मंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांमुळे शिक्षकांमध्ये अस्वस्थता असून, शासनाने या प्रश्नांकडे सकारात्मक आणि संवेदनशील दृष्टिकोनातून पाहण्याची मागणी यावेळी करण्यात आली.२००५ पूर्वी नियुक्त झालेल्या अंशतः अनुदानित शिक्षकांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळावा, टप्पा अनुदानाचा प्रलंबित विषय तातडीने मार्गी लागावा, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस आरोग्य उपचाराची सुविधा उपलब्ध करून द्यावी, यावर शिष्टमंडळाने विशेष भर दिला. अंशतः अनुदानित शिक्षकांच्या इतर प्रलंबित प्रश्नांवरही तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी प्रा. डॉ. बापूसाहेब आडसुळ यांनी संघटनेच्या माध्यमातून राज्यभरातील शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. शिक्षकांना त्यांच्या न्याय्य हक्कांपासून वंचित ठेवू नये आणि प्रलंबित मागण्यांवर ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी शिक्षकांच्या मागण्यांचा शासनस्तरावर सकारात्मक विचार करून प्रश्न लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत शासनाच्या पुढील भूमिकेकडे आता शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

या भेटीवेळी राज्य सल्लागार दत्तात्रय काशीद, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख रतिलाल डोंगरे, सोलापूर जिल्हाध्यक्ष वैभव शेटे, जिल्हा सचिव उमेश कल्याणी, सोलापूर शहराध्यक्ष जुबेर हिप्परगी, आप्पासाहेब पाटील, सुरज जमा आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: एकनाथ शिंदेजिल्हा परिषददेवेंद्र फडणवीससचिन जगतापसोलापूर
Previous Post

घाण पाण्याची समस्या सुटली; नगरसेवक जमादारांच्या तत्परतेने कामाला सुरुवात..

Next Post

मानद ‘कर्नल’ पदाचा सन्मान; कुलगुरू डॉ. महानवरांचा अभाविपकडून गौरव

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
मानद ‘कर्नल’ पदाचा सन्मान; कुलगुरू डॉ. महानवरांचा अभाविपकडून गौरव

मानद ‘कर्नल’ पदाचा सन्मान; कुलगुरू डॉ. महानवरांचा अभाविपकडून गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In